शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

महिला आयोग उभारणार सायबर डेस्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:59 IST

फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे.

मुंबई : समाज माध्यमांचा वापर वाढला असला, तरी त्यांच्या नियमनाची कोणतीच यंत्रणा सध्या भारतात अस्तित्वात नाही. विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य महिला आयोगाने घेतला आहे.समाज माध्यमांतील महिलाविरोधी प्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने स्थापन केलेल्या समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सायबर सिक्युरिटीवर काम करणारे प्रशांत माळी, वैशाली भागवत, सोनाली पाटणकर, मुक्ता चैतन्य यांच्यासह पोलिस दलातील सायबर तज्ञ उपस्थित होते. समाज माध्यमातील चर्चेत महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारची अवमानकारक टिप्पणी करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याची दखल घेत महिला आयोगाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली.देशात सायबर कायदे, सायबर सेल असले, तरी समाज माध्यमांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. हे गैरप्रकार रोखण्याचे काम कोणत्या यंत्रणेने करावे, याचीच स्पष्टता नाही. शिवाय, फेसबुक आणि टिष्ट्वटरसारख्या कंपन्या सर्व्हर परदेशात असल्याचे सांगत, सरकारी यंत्रणांची बोळवण करतात, अशी भावना बैठकीत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे विशेष सायबर डेस्क उभारणे, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय स्तरावर परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, याप्रकरणी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने नियमित बैठका घेऊन तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र