शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर वाढताच अनुदानात कपात; यापुढे टनाला चार हजार रुपयेच अनुदान, केंद्राचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:46 IST

केंद्र सरकारने देशातर्गत साखरेचे किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल ठरवून दिलेला आहे.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढू लागताच केंद्र सरकारने साखरेच्या निर्यात अनुदानात दोन हजार रुपयांची कपात केली आहे. २० मेपासून प्रतिटन चार हजार रुपयेच अनुदान मिळणार आहे. गेली दोन तीन वर्षे अडचणीतून जात असलेल्या साखर कारखानदारीला निर्यातीतून आता कुठे चांगले पैसे मिळत असतानाच अनुदानात कपात करून जादा मिळू शकणारे पैसे सरकारने काढून घेतल्याची भावना या उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने देशातर्गत साखरेचे किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल ठरवून दिलेला आहे. मात्र, उत्पादनखर्च ३५०० रुपयांच्या आसपास असल्याने तो वाढवून मिळावा या मागणीचा पाठपुरावा साखर कारखानदार गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. त्या मागणीवर कोणताही निर्णय घ्यायला सरकार तयार नाही. उलट निर्यात अनुदानात कपात करुन सरकारने एकप्रकारे धक्काच दिला आहे.गेल्यावर्षी निर्यातीवर प्रतिटन १० हजार ४४८ रुपये अनुदान होते. ५९ लाख टन साखरेची निर्यातही झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर वाढल्याने यंदा त्यात कपात करून ते प्रतिटन सहा हजार रुपये करण्यात आले आणि ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य देण्यात आले होते.

अनुदान २०२३ पर्यंतचजागतिक व्यापार करारानुसार साखर निर्यातीवर डिसेंबर २०२३ पर्यंतच अनुदान देता येणार आहे. यामुळेच अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर उपाय म्हणून सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने