शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

कडधान्येही येणार ग्राहकांच्या दारी : सदाभाऊ खोत

By admin | Updated: May 2, 2017 04:58 IST

ज्या पद्धतीने शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजीपाला नियमनमुक्ती केली आहे आणि शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी

ठाणे : ज्या पद्धतीने शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजीपाला नियमनमुक्ती केली आहे आणि शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी नेण्याचे धोरण सुरू केले, त्याच धर्तीवर कडधान्य नियमनमुक्तीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूतोवाच कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. या संदर्भात तत्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असून, शेतकऱ्यांचे कडधान्य थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.ठाण्यातील गावदेवी मैदानात संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान, तसेच नाम फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या आंबा आणि धान्य महोत्सवाचा शुभारंभ खोत यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची तूर २२ एप्रिलपर्यंत केंद्रावर पोचली असेल, अशांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्या सर्वांची तूर विकत घेतली जाईल, या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. काही ठिकाणी व्यापाऱ्यांची तूर शेतकऱ्यांच्या नावे विकण्याचे प्रकार घडले आहेत, असे प्रकार गेल्या काही दिवसात वाढतच चालले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती घेतली जाणार आहे. शिवाय अशाप्रकारे घोटाळा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सवठाण्यात ज्या पद्धतीने प्रथमच धान्य महोत्सव भरविण्यात आला आहे, त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी आता पिकवायला आणि विकायला देखील शिकला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता नाम फाऊंडेशन सारख्या संस्थांच्या माध्यमातून आपले धान्य थेट ग्राहकापर्यंत पोहचवावे, असे आवाहन त्यांनी केले.गारपीटग्रस्तांना भरपाईराज्यातील ज्या भागांत गारपीट झाली आहे आणि त्यामुळे जे काही नुकसान झाले असेल, त्या ठिकाणचे पंचनामे २४ तासांत करण्याचे आदेश देण्यात आले असून, तेथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असेही खोत यांनी स्पष्ट केले.कर्जमाफी मिळावी : अनासपुरेशेतकऱ्याला पाच लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी नाम फाउंडेशनचे प्रमुख, अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली, तसेच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांची तूर केंद्रावर पडून आहे, त्यांना पैसे मिळण्यास एक ते दीड महिन्यांचा कालावधी जाणार आहे. तरीही या शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस बजावली आहे. अशा शेतकऱ्यांचे व्याज माफ झाले पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे धान्य थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचा हा पहिला प्रयत्न आहे, तो यशस्वी झाल्यास राज्यात सर्वत्र तो राबवला जाईल, असे ते म्हणाले.केंद्रांवर तूर घेतली जात नसताना दुसरीकडे बँकांकडून मात्र, या शेतकऱ्यांना व्याज भरण्यासाठी नोटिसा बजावल्या जात असल्याच्या प्रश्नावर खोत यांना छेडले असता, त्यांनी सांगितले की, जो शेतकरी अडचणीत असेल, दुष्काळग्रस्त असेल, पाण्याचा प्रश्न त्याला सतावत असेल, अशांसाठी कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले जातील, असे खोत यांनी सांगितले.