शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

घन घन मंगल गावो... बजावो..

By admin | Updated: August 13, 2014 00:48 IST

अभिजात शास्त्रीय संगीताचे उपासक व सलग ४२ वर्षे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती शांतिनिकेतन येथे भारतीय संगीताचे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले मूळ नागपूरवासी

वझलवार स्मृती संगीत समारोह : गायन व वादनाची पर्वणीनागपूर : अभिजात शास्त्रीय संगीताचे उपासक व सलग ४२ वर्षे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती शांतिनिकेतन येथे भारतीय संगीताचे अध्यापक म्हणून कार्यरत असलेले मूळ नागपूरवासी प्रा. विद्याधर व्यंकटेश वझलवार यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. गुरुदेवांच्या सानिध्यात राहण्याचे व बहुसंख्य बंगाली संगीतप्रेमी विद्यार्थ्यांना शास्त्रीय रागसंगीताचे चपखल मार्गदर्शन करण्याचे भाग्य लाभलेल्या प्रा. वझलवार यांच्या या स्मृती समारोहात सुरुवातीला काही ज्येष्ठ संगीततज्ज्ञांचा आत्मीय सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे शास्त्रीय गायन व प्रतिभावान कलाकार पंडित वाल्मिक धांडे यांचे संतूर वादन हे या संगीत सभेतील सादरीकरण होते. शांतिनिकेतन आश्रमातील कुठल्याही विशिष्ट देवतेची मूर्ती नसलेल्या संपूर्ण काचेच्या ब्रह्ममंदिरात उपनिषदातील श्लोक पठनाचा सन्मान प्राप्त असणाऱ्या प्रा. वझलवारांची सांगीतिक परंपरा निष्ठेने जपणारे त्यांचे सुपुत्र प्रा. आनंद वझलवार यांच्या त्याच पवित्र सादरीकरणासह समारोहाचा आरंभ झाला. पंडितजींच्या सुकन्या व रवींद्र संगीताच्या सुमधूर गायिका अरुंधती विनोद देशमुख यांनी रवींद्र संगीतातील बंगाली रचनेचे भावपूर्ण सादरीकरण केले. आपल्या दीर्घ संगीत साधनेसह शास्त्रीय संगीताचे दालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीत तज्ज्ञांसह वझलवार कुटुंबीयांना आयोजन सहकार्य करणाऱ्या काही स्नेहीजनांचा विशेष सत्कार समारोहाचे अध्यक्ष व ज्येष्ठ संगीत रसिक बाबासाहेब उत्तरवार यांच्या हस्ते करण्यात आला. यात पंडितजींचे शिष्य व ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉ. बाळासाहेब पारखी, गायनाचार्य डॉ. उषा पारखी, पं. पुरुषोत्तम उपाख्य भैय्याजी सामक, पं. आबासाहेब इंदूरकर, पं. मधुसूदन ताम्हणकर, डॉ. बाळासाहेब पुरोहित, डॉ. राम म्हैसाळकर, डॉ. नारायण मंग्रुळकर, तसेच बंगाली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, बंगाली असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, वसंतराव कुलकर्णी, दत्ताभाऊ खानझोडे यांचा समावेश होता. यानंतर सुविख्यात गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांच्या सुमधुर गायनाने या आयोजनाचा आनंद अधिकच द्विगुणीत झाला. त्यांनी राग रागेश्रीसह गायनाची सुरुवात केली. शास्त्र नियमांच्या चौकटीत राहून सौंदर्यविषयक प्रणालीतून रागाची सुरेलतेने झालेली बढत, निकोप-सुरेल स्वर, लयकारीचे मोहक विभ्रम अशा स्वरूपाचे हे बुद्धी-भावनाप्रधान सुश्राव्य सादरीकरण होते. त्यानंतर विदर्भातील एकमात्र अग्रणी संतूरवादक पं. वाल्मिक दांडे यांचे नितांत श्रृतीमधूर संतुर वादन झाले. वादकाचे कलमांवरील प्रभुत्व, गायकी अंगाच्या राग चलनात संतूर ठेवण्याचे कौशल्य व अल्पवेळेतील सुरेल सादरीकरण यासह या समारोहाला चार चाँद लागले. यावेळी पं. वझलवार यांचे नातू व नवोदित कलाकार तसेच पं. वाल्मिक धांडे यांचे शिष्योत्तम प्रवीण झाडगावकर यांनीही राग चारुकेशीसह सुरेल संतूर वादन करून आपल्या प्रतिभेचा परिचय दिला. या समारोहाचे नेटके संचालन विनोद देशमुख यांनी केले. तर कलाकार व अतिथींचे स्वागत प्रा. आनंद वझलवार, चंद्रशेखर मुजुमदार यांनी केले. संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार, संगीतप्रेमी व मराठी-बंगाली रसिक यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)