शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

क्रूझवर होणार सप्ततारांकित सप्तपदी

By admin | Updated: March 17, 2017 02:43 IST

दुबईचा एक भारतीय व्यावसायिक रिजवान साजन यानं स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी चक्क एक क्रूज बुक केलं आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - जहाजावर लग्न तुम्ही कधी पाहिलं आहे. मात्र थांबा तुम्हाला लवकरच जहाजावर एका लग्नाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. दुबईचा एक भारतीय व्यावसायिक रिजवान साजन यानं स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी चक्क एक क्रूज बुक केलं आहे. विशेष म्हणजे या लग्नात 1000 पाहुणे सोयरे येणार असून, त्यात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचाही समावेश असणार आहे. हा विवाह सोहळा एका क्रूझवर इटली, स्पेन आणि फ्रान्सच्या खोल समुद्रात साजरा केला जाणार आहे.  कोस्टा फास्किनोसा या क्रूझवर 6 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत या लग्नाचा माहोल असणार आहे. या क्रूझची 114500 टन माल वाहून नेण्याची क्षमता असून, त्यामध्ये जास्तीत जास्त 3800 अतिथी राहू शकतात. एवढ्या पाहुण्या सोय-यांचा लवाजमा हा एका उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नासाठी येणार आहे. दुबईतल्या डेन्यूब समूहाचे सर्वेसर्वा रिजवान साजन यांचा मुलगा आदेल साजन याच्या लग्नासाठी एवढी तयारी करण्यात आली आहे. डेन्यूब समूह हा दुबईमध्ये इमारत बनवण्यासाठी लागणा-या साहित्याचा पुरवठादार आहे. आदेल साजन हा या समूहाचा संचालक आहे. आदेल हा साना खान हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साना ही दंतवैद्य चिकित्सक, सौंदर्यवती, कलाकार आणि लेखक आहे. चार दिवसांचा हा लग्न सोहळा बॉलिवूडच्या पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे. या लग्नाचं आयोजन वेडनिक्शा या विवाह नियोजन संस्था करत असून, ती स्वतः सोबत 1000 पाहुण्यांचा लवाजमा घेऊन येणार आहे. यात काही भारतीय उद्योगपती, नावाजलेल्या व्यक्तिमत्त्व आणि अरब अमिरातीतील बडे उद्योजकांचा समावेश असणार आहे. 6 एप्रिल ते 9 एप्रिल अशा चार दिवस चालणा-या या कार्यक्रमात 8 एप्रिल रोजी साना आणि आदेल लग्नबंधनात अडकणार आहे. इतर दिवशी अनेक संगीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नावाजलेल्या व्यक्ती आणि बॉलिवूड कलाकारांना गिफ्टही देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जगभरात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं समुद्राच्या आत एका क्रूझवर लग्न सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे अनेकांना या लग्न सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे.