शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अप्रमाणित कंपन्यांवर गुन्हे, यवतमाळच्या विषबाधाप्रकरणी झाडाझडती : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:53 IST

कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली.

मुंबई : कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली. त्यामुळे कीटकनाशक कंपन्या आणि वितरकांवर अप्रमाणित रसायने विक्री प्रकरणी कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असून, शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी येथे सांगितले.शेतकरी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर फुंडकर यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. कृषिमंत्र्यांनी कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. कंपन्यांनी केवळ नफा न कमवता शेतकºयांप्रति सामाजिक बांधिलकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. आपण उत्पादित केलेल्या कीटकनाशकामुळे शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात दाखल होत आहेत, याची माहिती घेण्याचीही गरज भासली नाही का, असा संतप्त सवाल कृषिमंत्र्यांनी केला. फवारणीबाबत मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे, अशा शब्दांत त्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींची कानउघाडणीकेली.गरजेपेक्षा जास्त कीटकनाशकांची विक्री झाल्याची चौकशी करण्यात आहे. सप्टेंबरमध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहिती, वापर, फवारणीचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमणार होते, मात्र नियुक्ती झाली नाही. बियाणे कंपन्यांनी किती बैठका घेतल्या, याची माहिती शासनाला सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.सहाय्यता निधी वर्गयवतमाळ जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मुख्यमंत्री साहाय्यता निधी निधीतून मंजूर केले असून, त्यासाठी एकूण ३२ लाख रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे.शेतकºयांचे मृत्यू हेबहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्रनागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन आतापर्यंत ४० शेतकºयांचे मृत्यू झाले आहेत. हा केवळ अपघात नव्हे, तर हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्र आहे. यासाठी कीटकनाशक बनवणाºया कंपन्या, त्याची शहानिशा न करता मंजुरी देणारे सरकार आणि त्याचे प्रमाणीकरण न तपासताच त्याचा उपयोग करू देणारे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.कीटकनाशक कंपन्यांनी १० हजार कोटींचा व्यवसायकेला. परंतु ही घटना झाली तेव्हा एकही अधिकारी ‘अ‍ॅण्टी डोस’चे कीट वाटायला आला नाही. मी आज सरकारमध्ये असलो तरी सातत्याने हा प्रश्न मांडत आहे. फडणवीस सरकार आम्ही केलेल्या सूचनांवर तातडीने कारवाईसुद्धा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.विनापरवाना कीटकनाशकांचा साठा अकोल्यातून जप्त!अकोला : पश्चिम विदर्भात विनापरवाना कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामांतून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तांसमोर होणार आहे.जहाल कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात ३४पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. सर्वाधिक मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झाले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील फेज २मध्ये माहेश्वरी बायो फ्यूएल प्लॉट क्रमाक १४ येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅक्चर कंपनीफेज २ प्लॉट नं. एफ -२२मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणांहून अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविली जात होती. गुणनियंत्रण विभागाने मागील आठवड्यात येथे छापा टाकला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार