शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:18 IST

येवला : शहरातील मेनरोडवर मंगळवारी (दि. ५) भरलेल्या भाजीपाला बाजारात शहरवासीयांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

येवला : शहरातील मेनरोडवर मंगळवारी (दि. ५) भरलेल्या भाजीपाला बाजारात शहरवासीयांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अनेक विक्रेते आणि खरेदीदार यांनी तोंडाला रुमाल वा मास्कही बांधला नसल्याचेही चित्र होते.मंगळवारी येवला तालुक्याचा आठवडे बाजार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने आठवडे बाजार बंद आहेत. त्यात नवीन आदेशाने भाजीपाला, फळे विक्री, किराणा व औषध दुकाने, रुग्णालये सुरू राहणार असल्याचे जाहीर झाल्याने सकाळी शहरातील मेनरोडवर भाजीपाला बाजार मोठ्या प्रमाणात भरलाहोता.शहरवासीयांनीही खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. आठवडे बाजाराप्रमाणे या बाजारात भाजीपाल्याबरोबरच तंबाखू, खाण्याची पाने, बोंबील, शिरया-झाडू, फळे, नारळ आदी विक्रीची दुकाने फुटपाथवर दुतर्फा लागली होती. याबरोबरच मेनरोडवरील किराणा दुकानेही सकाळपासूनच उघडण्यात आली होती. काही शेतकऱ्यांनी मोटरसायकल, सायकलवरून मेथी, कोथिंबीर, मिरच्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी आंबे, टरबूज-खरबूज विक्र ीची वाहनेही उभी होती.शहर पोलिसांनी तर विशेष मोहीम राबवून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाईही केली आहे. मात्र, रोज उगवणारा दिवस प्रशासनाला आव्हान देणारा ठरत असून, लोकांची गर्दीरोखणे, शिस्त लावणे यातच प्रशासन व पोलीस यंत्रणेचा वेळ व ऊर्जा वाया जात आहे.----------------------------------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन वारंवार डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला रूमाल वा मास्क वापरा, असे प्रबोधन व जागृती शहरात करत आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर तर सोशल डिस्टन्सिंग व मास्क आवश्यक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही निघालेले आहेत, मात्र अजूनही शहरवासीय गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. अनेकदा समज देऊनही लोक घराबाहेर पडायचे थांबत नाहीत.

टॅग्स :Nashikनाशिक