शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:13 IST

शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत असं पडळकर म्हणाले.

धुळे - या महाराष्ट्रात जातीवाद पसरवणे, भ्रष्टाचार करणे, अनेक भागांना पाण्यापासून वंचित ठेवणे, मुलभूत सुविधा न देणे. राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री काय केले? देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य सांगितले आणि पवारांचा चेहरा डांबरासारखा काळा झालाय. त्यामुळे पवारांकडे उत्तर नाही. ते यावर बोलू शकत नाहीत. ते निरुत्तर आहेत अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनीशरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी १५ दिवसांपूर्वी पवारांच्या खेळीनं पहाटेचा शपथविधी झाला हे सांगितले होते. शरद पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही हे पुन्हा सिद्ध झाले.सरकार मजबूत आहे. शिल्लक असलेली माणसं टिकवण्यासाठी काहींना सरकार कोसळणार अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच विरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार म्हटला नाही मला पक्ष सोडायचा आहे. आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय असं म्हटलं नाही. त्यामुळे सरकार पूर्ण मजबूत आहे, काही चिंता करू नका असंही पडळकरांनी म्हटलं. 

दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने आणि पाठीत खंजीर खुपसण्यानं कालवंडलेला होता. मागच्या महिन्यात त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. फडणवीसांनी एकच विधान केल्यानं पवारांचा कालवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. 

फडणवीसांचं एक विधान अन् राज्यात पुन्हा चर्चापहाटेच्या शपथविधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. परंतु, फडणवीसांनी पहिल्यांदाच हा दावा केलेला नाही. दोन वर्षांअगोदर नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान सर्वांत अगोदर फडणवीस यांनी यासंदर्भात गौप्यस्फोट केला होता व उघडपणे शरद पवार यांचे नाव घेतले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रपती शासनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र फडणवीसांनीच ‘ड्राफ्ट’ केल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. मात्र, त्यावेळी राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता त्यावर जास्त वादळ उडाले नव्हते. विशेष म्हणजे, ‘लोकमत’कडेच त्या वक्तव्याचा ‘व्हिडीओ’ होता.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस