शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारीत वाढ- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 16:47 IST

आपण पर्यटन जिल्ह्याकडे वाटचाल करीत असताना सिंधुदुर्गमध्ये घडणारे वाढते गुन्हे यामुळे येथील पर्यटन धोक्यात येत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

सिंधुदुर्ग : आपण पर्यटन जिल्ह्याकडे वाटचाल करीत असताना सिंधुदुर्गमध्ये घडणारे वाढते गुन्हे यामुळे येथील पर्यटन धोक्यात येत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्राच्या क्राईम अहवालानुसार सिंधुदुर्गमध्ये २०१४च्या तुलनेत २०१७मध्ये साडेतीन टक्क्यांनी गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सावंतवाडी आयोजित माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सुंदरवाडी महोत्सवाच्या तिस-या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, गुरू पेडणेकर, उपसभापती निकिता सावंत, महिला तालुकाध्यक्ष गीता परब, जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गावकर, पल्लवी राऊळ, उन्नती धुरी, नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक, उदय नाईक, दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, आनंद शिरवलकर, केतन आजगावकर, किरण सावंत, गुरू मठकर, दिलीप भालेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला.सावंतवाडीला एका सांस्कृतिक चळवळीचा वारसा आहे. हीच सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचे काम माजी खासदार निलेश राणे, संजू परब व त्यांचे सहकारी करीत आहेत. एवढा मोठा महोत्सव सलग तीन वर्षे आयोजित करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची मेहनत निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. सावंतवाडीची प्रतिमाच या महोत्सवाच्या माध्यमातून उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे, असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कणकवली येथे अद्ययावत चित्रपटगृह आहे. पण सावंतवाडीत नाही. येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. एखादी व्यक्ती जर चित्रपट पाहण्यासाठी गेला तर त्याला आपण सुरक्षित घरी जाऊ का याची चिंता वाटते.सावंतवाडीमध्ये पर्यटन वाढावे असे वाटत असेल, तर गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि आम्हीही टीका विरोधक म्हणून करीत नाही, राज्याचा एक क्राईम अहवाल निघतो, त्यात सर्व साधारणपणे आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीत जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वीचे गुन्हे आणि आता वाढ झालेले गुन्हे यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही यावेळी आमदार राणे यांनी दिला आहे. मी येत्या अधिवेशनात शांत बसणार नाही. सावंतवाडीत घडणारे सर्व प्रकार विधानसभेत मांडणार असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही करणार आहे. पर्यटन जिल्हा करीत असताना हे चालले ते योग्य नाही. गोवा पर्यटनावर चालतो, पण तेथे अशी गुन्हेगारी नाही याचाही विचार झाला पाहिजे, असेही आमदार राणे म्हणाले.

महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. राजेश नवांगुळ, प्रदीप सावंत, स्नेहा टिळवे, उद्योजक राजन आंगणे, डॉ. विष्णू नाईक आदींचा सत्कार करण्यात आला. तर स्वाभिमानचे नेते संदीप कुडतरकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली.तसेच कणकवली येथे नाट्यगृह होऊ शकते, मग सावंतवाडीमध्ये का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. तर किरण सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा करण्यात नारायण राणे यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर अनेक तालुक्यात महोत्सव झाले, असे सांगितले.बाबा माका संकासूर बघूचो हा! संवादाला रसिकांची दादकलाकार सार्थक वाटवे यांचा आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सार्थक याने दोन विनोदही यावेळी रसिकांसमोर सादर केले. यात बाबा माका संकासूर बघूचो हा असे म्हणताच उपस्थितांनी त्याला चांगलीच दाद दिली. यावेळी भार्गवी चिरमुले, केतकी पालव, प्रांजल पालकर व संदीप गायकवाड, प्रसाद खांडेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी प्रियांका जाधव व निशा बारोत यांचा नृत्याविष्कार व कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाचा कार्यक्रम यादगार ठरला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग