शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 07:48 IST

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि  असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली आहे. 

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्रातील २८८ पैकी १७६ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. टक्केवारीत ही संख्या ६२ टक्के इतकी प्रचंड आहे. यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या ११३ अर्थात ४० टक्के इतकी आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांमध्ये दोघांवर खुनाचा तर ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर चौघांवर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि  असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली आहे. 

गुन्हे दाखल असलेल्या आमदारांमध्ये भाजपचे १०५ पैकी ६५ आमदार असून, ४० आमदारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. शिवसेनेच्या ५५ पैकी ३१ आमदारांवर गुन्हे नोंद असून, २६ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ३२ आमदारांवर विविध गुन्हे असून, १७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

काँग्रेसच्या ४४ पैकी २६ जणांवर गुन्हे नोंद असले तरी १५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. १२ अपक्षांपैकी ९ जणांवर विविध गुन्हे दाखल असून, यापैकी ६ जणांवर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

राज्यातील ६ आमदार डॉक्टरेट, तर १९ जण पाचवी ते आठवी पास

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील २८८ पैकी २८५ आमदार शिक्षित आहेत. यात सहा जण डॉक्टरेट असून, ७२ जण पदवीधर तर १९ आमदार पाचवी ते आठवी पास आहेत. तिघांच्या अर्जाचे विश्लेषणकेलेले नाही.विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत सर्वपक्षीय आमदारांनी सादर केलेल्या शपथपत्रांच्या आधारे एडीआरने हे विश्लेषण केले आहे.  

शिक्षणनिहाय आमदारांची संख्या    शिक्षित    ४    पाचवी पास    ६    आठवी पास    १३    दहावी पास    ४४    १२वी पास    ५४    पदवीधर    ७२    इतर पदवीधारक    ५१    पदव्युत्तर    ३५    डॉक्टरेट    ६

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vidhan Bhavanविधान भवन