शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जवान मॅथ्यूच्या आत्महत्त्येप्रकरणी महिला पत्रकारावर गुन्हा

By admin | Updated: March 28, 2017 18:04 IST

मॅथ्यू यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिल्लीमधील एका महिला पत्रकारासह सेवानिवृत्त लष्करी जवानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नाशिक : देवळाली कॅ म्प परिसरातील लष्करी हद्दीमधील एका पडक्या घराच्या २ मार्च रोजी जवान रॉय मॅथ्यू याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. मॅथ्यू यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिल्लीमधील एका महिला पत्रकारासह सेवानिवृत्त लष्करी जवानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या हद्दीतील महिंद्र हेगलाइन येथे दिल्लीच्या द क्विंट न्यूज चॅनलच्या पत्रकार संशयित पूनम अग्रवाल (रा. दिल्ली) व सेवानिवृत्त जवान दीपचंद (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांनी अग्रवाल यांना सैन्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला तसेच त्यांना छायाचित्रण करण्यासही सांगितले. यासाठी त्यांनी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचे समजते. यावेळी मॅथ्यू यांचेही छायाचित्रण करण्यास त्यांनी सांगितले. या छायाचित्रणाची चित्रफीत चुकीच्या पध्दतीने २४ फेब्रुवारी रोजी सादर केला. यामुळे लष्कराची बदनामी होईल, अशा पध्दतीने हा व्हिडिओ व्हायरल केला. यामुळे मॅथ्यू तणावाखाली आले होते. त्यामुळे त्यांनी २ मार्च रोजी गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याचे उघडकीस आले होते. या संपूर्ण घटनेप्रकरणी देवळाली कॅम्प येथील आर्टीलरी स्कूल (तोफखाना)चे लान्सनायक नरेशकुमार , अमितचंद्र जाटव यांनी दिल्लीच्या संशयित महिला पत्रकार आणि सेवानिवृत्त लष्करी सेवेतील दीपचंद यांच्याविरुध्द फिर्याद देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक लोहकरे करीत आहेत.