शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

मित्रदेशाशी युद्ध पुकारल्याचा गुन्हा

By admin | Updated: November 30, 2014 01:40 IST

‘इसिस’ या अतिरेकी संघटनेत सामील झालेल्या कल्याण येथील आरिफ माजिदला शनिवारी विशेष न्यायालयाने 8 डिसेंबर्पयत राष्ट्रीय तपास यंत्रणोच्या (एनआयए) कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

8 डिसेंबर्पयत कोठडी : गुन्हा सिद्ध झाल्यास आरिफला फाशी
मुंबई : ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेत सामील झालेल्या कल्याण येथील आरिफ माजिदला शनिवारी विशेष न्यायालयाने 8 डिसेंबर्पयत राष्ट्रीय तपास यंत्रणोच्या (एनआयए) कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शुक्रवारी अटक केल्यानंतर आरिफची कोठडी मिळवण्यासाठी एनआयएने त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर. देशमुख यांच्यासमोर हजर केले. त्या वेळी आरिफची 14 दिवस कोठडी द्यावी, अशी मागणी एनआयच्या प्रॉसिक्युटर गीता गोडांबे यांनी केली. 
आरिफ सहभागी झालेल्या अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टवर भारत, इराक व सिरीया हे देश आहेत. त्यामुळे या संघटनेने अतिरेकी कारवायांसाठी नेमकी काय आखणी केली आहे. तसेच आरिफसोबत इराकला गेलेल्या कल्याण येथील इतर तिघांची माहिती घेण्यासाठी आरिफची 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी  गोडांबे यांनी केली.
त्यानंतर न्यायालयाने आरिफला तुला कधी अटक केली व तुला काही बोलायचे आहे का, असा सवाल केला.  कसालाही पश्चात्ताप नसलेल्या भावात आरिफने याचे उत्तर दिले. तो म्हणाला, मला शुक्रवारी अटक झाली असून, मला काहीच बोलायचे नाही.
न्यायालयात आणले तेव्हा  आरिफने गडद विटकरी रंगाचा पठाणी सूट परिधान केलेला होता. वकील का केला नाही, असे न्यायाधीशांनी विचारले तेव्हा आरिफने, एनआयएच्या ताब्यात होतो, त्यामुळे वकील करायला वेळ मिळाला नाही, असे उत्तर दिले. तपासकत्र्याविषयी काही तक्रार आहे का, या न्यायालयाच्या प्रश्नास त्याने ‘नाही,’ असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)
 
अंगावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा
अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या आरिफच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा असल्याचे अॅड. गुडंबे यांनी न्यायालयाला सांगितले. या खुणा कधी झाल्या आहेत हे आरिफच्या जबाबातून स्पष्ट होईल.
आरिफविरुद्ध नोंदविलेले गुन्हे
च्बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा, कलम 16 - हे अतिरेकी कारवायाच्या शिक्षेचे कलम आहे. अतिरेकी हल्ल्यात कोणाचा बळी गेल्यास त्या संघटनेच्या सदस्याला जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. 
च्कलम 18 - कट रचणा:याला या कलमाअंतर्गत शिक्षा दिली जाते. पाच वर्षापासून जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
च्कलम 2क् - अतिरेकी संघटनेचा सदस्य झाल्यास जन्मठेपेची शिक्षा 
च्या कायद्यान्वये ‘इसिस’वर भारताने बंदी घातलेली नाही. परंतु संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने ‘इसिस’ला दहशतवादी संघटना ठरवून तिला प्रतिबंधित यादीत टाकले आहे. शिवाय अशा संघटनांच्या कारवायांना सर्व देशांनी प्रतिबंध करावा, असा ठरावही संयुक्त राष्ट्रांनी केला आहे. भारत संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असल्याने भारताच्या दृष्टीनेही ‘इसिस’ ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना ठरते.
च्भारतीय दंड संहिता कलम 125- भारतासोबत चांगले हितसंबंध असणा:या आशियातील देशाविरोधात युद्ध पुकारल्यास जन्मठेपेची शिक्षा..
 
च्आरिफला पुढील काही दिवस एनआयएच्या मुंबईतील खंबाला हिल येथील कार्यालयातच कोठडीत ठेवण्यात येणार असून, तेथे महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक व अधीक्षक दर्जाचे अधिकारी त्याची जबानी घेतील, असेही सूत्रंनी सांगितले. सूत्रंनी सांगितले की, इराकमध्ये ‘इसिस’च्या अमानुष सशस्त्र उठावात नेमकी कोणती भूमिका बजावली, त्याला तेथे जाण्यासाठी भारतात आणि भारताबाहेर कोणी मदत केली, कुठे-कुठे वास्तव्य केले. अशा खरे चित्र स्पष्ट होण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना आरिफ मोघम किंवा परस्परविरोधी उत्तरे देत आहे. 
 
च्यावरून तो सत्य लपविण्यासाठी कल्पित कथा रचत आहे, 
असा ‘एनआयए’ला संशय 
आहे. म्हणूनच, एक सविस्तर प्रश्नावली तयार करायची व नार्को/ लाय डिटेक्टर चाचण्या घेऊन त्याची उत्तरे आरिफकडून काढायची, अशी ‘एनआयए’ची योजना आहे.
च्आरिफच्या वागण्या-बोलण्यातून, केल्या कृत्यांबद्दल त्याला जराही पश्चात्ताप झाला असल्याचे दिसत नाही. त्याचे मानसिक संतुलन ठीक असून खाणो-पिणोही सामान्यपणो सुरू आहे, असे सूत्रंनी सांगितले. आरिफच्या निकटच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलणो टाळले, एवढेच नव्हेतर त्यांनी न्यायालयात त्याच्यासाठी कोणी वकीलही उभा केला नाही.