शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 12:42 IST

महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

नागपूर : महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. गुंडगिरी करणाऱ्यांचा मुलाहिजा बाळगणार नाही. पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली असून, आज महापौरांना  भेटणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे, जर महापौर सुरक्षित राहणार नसतील, तर याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यासाठी सरकारवर दबाव आणणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.  दरम्यान, बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी मध्यरात्री महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून बेछूट गोळीबार केला. गोळ्या गाडीवर लागल्याने जोशी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोरांनी एकामागोमाग एक अशा चार गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. ही घटना अमरावती आऊटर रिंग रोडवर मंगळवारी मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.महापौर संदीप जोशी वर्धा मार्गावरील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच्या रसरंजन धाब्यावरील स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून 12च्या सुमारास कुटुंबीय व आपल्या मित्रासह नागपूर शहराकडे परत येत होते. धाब्यावरून 7 गाड्या नागपूरच्या दिशेने निघाल्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. तर सर्वात मागे जोशी यांची गाडी होती. संदीप जोशी फॉर्च्युनर गाडी चालवित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीवार केला. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे