शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

सेवाभावी कामातून स्वतःची ओळख निर्माण करा- नारायण राणे

By admin | Updated: February 26, 2017 19:44 IST

लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते. आपण त्या लोकांचे प्रतिनिधी असतो. म्हणूनच आपण साहेब बनून न वागता जनतेचे सेवक आहोत, याची जाणीव

ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 26 - लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते. आपण त्या लोकांचे प्रतिनिधी असतो. म्हणूनच आपण साहेब बनून न वागता जनतेचे सेवक आहोत, याची जाणीव ठेवून समाजामध्ये विनम्रतेने व सेवाभावीवृत्तीने तसेच परिपूर्ण अभ्यास करून जबाबदारीने काम करा. आपल्या चांगल्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण करा व कॉँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवा. अशाप्रकारचा कानमंत्र माजी मुख्यमंत्री, कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी कॉँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यांना दिला. येथील ओम गणेश निवासस्थानी रविवारी नारायण राणे यांनी कॉँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना पुढील कामकाजासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, रणजित देसाई, मधुसुदन बांदिवडेकर, संजू परब, गुरूनाथ पेडणेकर, सुरेश सावंत, प्रमोद कामत, मंदार केणी आदी मान्यवर उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, स्वत:ही नावारूपाला येऊन कर्तृत्ववान बना. आपली वैचारिक व बौद्धिक पातळी जेवढी वाढवाल तेवढी प्रगती साधता येईल. जनसेवेचे कार्य यालाच मी खरा दागिना समजतो. लोकांशी सतत संपर्क ठेवा. लोकशाहीत सत्ताधारी व विरोधक एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तुम्ही विश्वस्त आहात या भावनेने तुम्ही काम करा. नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या अंगी अभ्यासू वृत्ती बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक यशस्वी महान व्यक्तिची चरित्रे अभ्यासून आत्मसात करा. या सर्व महान व्यक्तिनी आपल्या आयुष्यात शिस्त पाळली व अभ्यासूपणा बाळगला म्हणूनच ते मोठे झाले. आयुष्यात यशस्वी लोकप्रिय व कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी बनायचे असेल तर लोकसंपर्क कायम ठेवा. स्वत: स्वस्त होऊ नका. मात्र, तुमच्याकडे येणाऱ्या लोकांशी सौजन्याने वागा. त्यांची ओळख कायम ठेवा. नंतर काही कालावधीनंतर ते आपल्याला भेटले तर त्यांना नावाने हाक मारा. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्याांच्याशी विनम्रपणे वागा. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुधाकरराव नाईक हे आपल्या राजकीय जीवनात पहिल्यांदा सरपंच होते. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद यावर सदस्य व पदाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते मंत्री आणि मुख्यमंत्री बनले. माझ्या राजकीय जीवनात प्रारंभी मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर मुख्यमंत्री पदापर्यंत मी पोहोचलो. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य हे पद कमी समजू नका. तुम्हीही मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकता. अशाप्रकारे जिद्द ठेवून जनतेच्या सेवेच्या व आपल्या भागाच्या विकासासाठी कार्यरत रहा,असेही ते म्हणाले. कॉँग्रेस जिल्हा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. तर दत्ता सामंत तसेच सतीश सावंत यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पक्षशिस्त व मतदारसंघातील कामकाजाची यावेळी माहिती दिली. (प्रतिनिधी) ठेकेदारी करता येणार नाही!कॉँग्रेस पक्षाला अभिमान वाटेल असे काम करण्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सदस्यांना कामाचा ठेका घेता येणार नाही. ठेकेदारी करता येणार नाही, अशी सक्त ताकीदही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित सदस्याना दिली. सदस्य संख्या घटल्याचा विचार करा!जिल्हापरिषद् मध्ये यापूर्वी कॉँग्रेसचे ५० पैकी ४२ सदस्य होते. ही सदस्य संख्या आता २८ वर आली आहे. तर जिल्हयातील पंचायत समित्यांमध्ये १०० पैकी ७६ सदस्य होते. आता ही संख्या ५६ वर आली आहे. राज्यात अन्यत्र कुठेही कॉँग्रेसला सत्ता मिळालेली नाही.हे खरे असले तरी यापूर्वीची सदस्य संख्या का घटली? याचाही गांभीर्याने विचार करा. ज्या सदस्यांनी आपल्या मतदारसंघात लोकसंपर्क ठेवला नाही. आपल्या भागाचे विकासाचे काम केले नाही, असेच सदस्य पराभूत झाले आहेत. याचे भान बाळगा. मतदारसंघात आपण पुढील पाच वर्षांत चांगले काम केलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा विजयी व्हाल, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले. भ्रष्टाचाराला थारा देऊ नका !गैरमार्गाने, भ्रष्टाचाराने मिळणाऱ्या पैशाची आस धरू नका. आडमार्गाने, भ्रष्टाचाराने मिळालेल्या पैशाची समाजात चर्चा होते. व आपलीही बदनामी होते. म्हणूनच मेहनत व परिश्रम करून पैसा मिळवा. समाजकार्य व राजकारण करताना पहिल्यांदा आपल्या कुटुंबाकडे व संसाराकडे लक्ष द्या. समाजकार्य व स्वत:चा संसार याची सांगड घाला व यशस्वी व्हा.असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.