शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर विभागाने केली शीघ्र कृती दलाची स्थापना : अर्ध्या तासात होणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 20:10 IST

मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

ठळक मुद्देनिवडणुकीतील काळ्या पैशांवर ठेवणार लक्षकाळा पैसा बाळगणाऱ्यांना मिळणार दंड

पुणे : लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापराला आळा बसावा यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदार संघामध्ये शीघ्र कृती दलाची (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. प्राप्तिकरच्या पुण्यातील कार्यालयातून मुंबई वगळता राज्यातील ४८ पैकी ४२ लोकसभा मतदार संघावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक दीपक कपूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्राप्तिकर विभागाचे (तपास) अतिरिक्त संचालक तथा तपास यंत्रणेचे राज्याचे समन्वयक अजय मोदी, अतिरिक्त संचालक रवी प्रकाश या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तीकर विभागाने सतर्क रहावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला दक्षतेचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे अथवा मौल्यवान वस्तूंच्या वापरावर नजर ठेवली जाणार आहे.याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक कपूर म्हणाले, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरीत राज्यातील ४२ मतदार संघामधील काळ्या पैशाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुणे कार्यालयावर असेल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी (दि. ११) नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. पाठोपाठ प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दल स्थापण्यात आले. त्याच्या नियंत्रणाची जबाबदारी अतिरिक्त संचालक आणि चार सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.  मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणूक काळात अशा प्रकारे कोणी वर्तन करताना आढळल्यास, नागरिकांनी प्राप्तीकर विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी चोवीस तास निरीक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी १८००२३३०७०० अथवा १८००२३३०७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ७४९८९७७८९८ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राप्तीकर विभागाने केले आहे.-------------------काळा पैसा बाळगणाऱ्यांना मिळणार दंडनिवडणुकीच्या दरम्यान काळा पैसा आढळणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून ज्ञातस्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी कारवाई होईल. दंडासह ती रक्कम भरावी लागेल. अनेकदा नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा रक्कमेचा निवडणुकीत वापर केला जातो. त्यामुळे रक्कमेचा स्त्रोत देखील तपासण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त पोलिसह संबंधितांवर वेगळी कारवाई करतील.  

टॅग्स :black moneyब्लॅक मनीIncome Taxइन्कम टॅक्सElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक