शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

खडसेंवर गुन्हा? आज फैसला

By admin | Updated: March 8, 2017 06:03 IST

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत चालढकल करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले.

- भोसरी जमीन गैरव्यवहार

मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत चालढकल करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले. खडसेंवर गुन्हा दाखल करणार की नाही, याबाबत २४ तासांत आपले म्हणणे सादर करा, असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिला.महसूलमंत्री पदाचा दुरुपयोग करून भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन अवघ्या तीन कोटी ७५ लाख रुपयांना खडसे यांनी पत्नी व जावयाच्या नावावर खरेदी केली, अशी याचिका पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी अ‍ॅड. एस. एस. पटवर्धन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होती. खडसेंविरुद्ध पुरावे नसल्याने झोटिंग आयोगाच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत, अशी सबब सरकार पक्षाने पुढे केली. त्यावर गुन्हा नोंदवणार की नाही, अशी विचारणा करत, न्यायालयाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली. (प्रतिनिधी) काय आहे प्रकरण?याचिकेनुसार, खडसे यांनी भोसरीत विकत घेतलेल्या जमिनीवर (सर्वे क्रमांक ५२/२ अ/ २) एमआयडीसीने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर अनेक कंपन्यांना जागा दिली आहे. असे असतानाही २८ एप्रिल २०१६ रोजी ही जमीन मंदाकिनी खडसे व खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या नावावर करण्यात आली.