शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या दर्जाला तडे, पुलाचा स्लॅब पडला, माळीवाडा इंटरचेंजवरील पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह

By विकास राऊत | Updated: June 11, 2025 09:37 IST

Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील (माळीवाडा इंटरचेंज) वरील पुलाचा स्लॅब पडल्याने कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे धिंडवडे निघाले आहेत.

- विकास राऊत छत्रपती संभाजीनगर - समृद्धी महामार्गावरील (माळीवाडा इंटरचेंज) वरील पुलाचा स्लॅब पडल्याने कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे धिंडवडे निघाले आहेत. अडीच वर्षांत ३ वेळा महामार्गावरील सरफेस, पूल, एक्सपान्शन जॉइंटच्या कामाच्या दुरुस्तीवरून यंत्रणेच्या कामाच्या ‘दर्जा’ची प्रतिष्ठा मातीत मिळाली आहे.

२ हजार कोटींतून ५४ कि.मी. अंतराचे काम मेघा इंजिनिअरिंग या कंत्राटदाराने, तर ५६ कि.मी.चे काम ‘एल ॲण्ड टी’ या संस्थेने केले आहे. बेंबेवाडी ते फातियाबाद मेघा व त्यापुढे सुरालापर्यंत एल ॲण्ड टीने काम केले आहे. 

मेघा इंजिनिअरिंगच्या अखत्यारीत महामार्गाच्या पुलावरील स्लॅब पडणे, काँक्रिटला तडे जाणे, जॉइंट दुरुस्तीचे काम करावे लागत असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ष २०२६ पर्यंत सदरील कंपनीचा डीएलपी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) आहे. या काळात महामार्गाच्या डागडुजीची जबाबदारी या कंत्राटदार संस्थांची आहे. 

विनापडताळणी बोलणे अशक्य कंत्राटदाराच्या जबाबदारीवर व खर्चाने दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले आहे. महामार्गाच्या कामात अनेक तज्ज्ञ संस्था सहभागी होत्या. सध्या ज्या अडचणी आहेत, त्याची तपासणी होत नाही, तोपर्यंत गुणवत्तेबाबत बोलता येणे शक्य नाही, असे एमएसआरडीसीचे अभियंता सुरेश जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर