स्फोटासोबत जातीय दंगलीचेही कारस्थान

By Admin | Published: July 16, 2016 03:23 AM2016-07-16T03:23:26+5:302016-07-16T03:23:26+5:30

पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची

Crackle of communal riots with blasts | स्फोटासोबत जातीय दंगलीचेही कारस्थान

स्फोटासोबत जातीय दंगलीचेही कारस्थान

googlenewsNext

नरेश डोंगरे,   नागपूर
पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची, असे दुहेरी कुटील कारस्थान आयएसआयएसने रचले होते. मात्र, गोंधळलेल्या नासेरबिन अबूबकर याफई-चाऊस (वय २१) याला घाईगडबडीने बॉम्ब बनविता
आला नाही. त्यामुळे आयएसआयएसचे मनसुबे प्रत्यक्षात आले नाही आणि महाराष्ट्र
एका मोठ्या षड्यंत्रापासून
बचावला. परभणीतून एटीएसने
अटक केलेल्या नासेरबिनच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बुधवारी मध्यरात्रीपासून एटीएसच्या ताब्यात असलेल्या चाऊसकडून तपास पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, चाऊस गेल्या वर्षभरापासून इसिसच्या (फारुखच्या) संपर्कात होता. ‘आपल्या लोकांवर खूप अत्याचार होत आहे. त्यांची मदत करण्यासाठी आपण पुढे आलेच पाहिजे, अशी चाऊसची मानसिकता बनवून घेण्यात फारुखने यश मिळवले होते.
‘हम अपने कौम के लिए कुछ कर दिखायेंगे’ असे फारुखच्या पुरत्या प्रभावात असलेल्या चाऊसने ठरवले होते. आपल्यावर कोण, कुठे आणि कसा अत्याचार करीत आहे, हे समजून घेण्याऐवजी फारुखने डोक्यात भरविल्यानुसार महाराष्ट्रात मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी चाऊसने केली होती.
त्याला फारुख बॉम्ब कसा बनवायचा, त्याचा स्फोट कसा घडवून आणायचा, त्याचे आॅनलाईन प्रशिक्षण देत होता. त्यासाठी चाऊसने साहित्य खरेदी केले होते.
मात्र, आॅनलाईन प्रशिक्षणामुळे अनेक बाबी चाऊसला कळल्याच नाही. त्यामुळेच बॉम्ब बनविण्याचा आणि रमजान महिन्यात त्याचा स्फोट घडवून आणायचा फारुखचा अर्थात इसिसचा कट पूर्णत्वाला जाऊ शकला नाही.

Web Title: Crackle of communal riots with blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.