शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गाईच्या दूध विक्री दरात आजपासून लिटरला दोन रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:24 IST

कर्नाटकच्या ‘नंदिनी’चे दूध मिळणार पूर्वीच्याच दराने

ठळक मुद्देराज्यात सध्या गाईचे दूध मागणीच्या पटीत पुरवठा होत नाहीदूध पावडरीचे दर वाढल्याने व पावडर निर्यातपावडरीसाठी मोठ्या प्रमाणावर दूध वापरले जात आहे

सोलापूर:  गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयाने वाढ झाली असून, मंगळवारपासून बहुतेक दूध संघ दरवाढीची अंमलबजावणी करणार आहेत. कर्नाटकचा नंदिनी संघ मात्र पूर्वीप्रमाणेच प्रतिलिटर ४० रुपयाने दूध विक्री करणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात सध्या गाईचे दूध मागणीच्या पटीत पुरवठा होत नाही. दूध पावडरीचे दर वाढल्याने व पावडर निर्यात होऊ लागल्याने पावडरीसाठी मोठ्या प्रमाणावर दूध वापरले जात आहे. यामुळे राज्यातील ग्राहकांना पॅकिंग किंवा लूज पद्धतीने विक्रीसाठी मागणीच्या पटीत पुरवठा होऊ शकत नसल्याचे दूध संघ चालकांचे मत आहे. यामुळे गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २९ रुपयांपासून ३२ रुपयांपर्यंत वाढला आहे. एक डिसेंबरपासून गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर वाढविण्यात आला आहे. काही संघ २९ रुपयाने मात्र  बहुतेक संघ त्यापेक्षा अधिक दराने दूध खरेदी करीत आहेत. 

दूध टंचाईमुळे खरेदी दरात वाढ झाल्याने महाराष्टÑ राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दूध विक्री दरातही दोन रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी मंगळवार दिनांक १७ डिसेंबरपासून बहुतेक संघ करणार आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी दूध (दूध पंढरी) संघ, सोनाईसह अनेक सहकारी व खासगी दूध संघांनी दूध विक्री दर प्रतिलिटर ४४ रुपयांवरुन ४६ रुपये केला आहे. एमआरपी प्रतिलिटर ४४ वरुन ४६ रुपये केल्याचे सोनाई दूध संघाच्या दशरथ माने यांनी सांगितले.

एकीकडे महाराष्टÑातील सहकारी व खासगी संघांनी विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली असली तरी कर्नाटक सरकारच्या नंदिनीचे दूध मात्र पूर्वीप्रमाणे ४० रुपयानेच विक्री होणार असल्याचे सांगण्यात आले. महाराष्टÑातील बहुतेक सहकारी व खासगी संघ ४६ रुपयाने(एमआरपी) दूध विक्री करणार असताना नंदिनी मात्र ४० रुपयाने(एमआरपी) दूध विक्री करणार असल्याचे सांगण्यात आले.

‘कर्नाटक’चे ५ रुपये अनुदान..कर्नाटकमध्ये कर्नाटक फेडरेशन नावाने राज्यभरासाठी एकच संस्था दूध संकलनाचे काम करते. संपूर्ण राज्यात ही फेडरेशन प्रतिलिटर गाईचे दूध २६ रुपये व म्हशीचे दूध ३५ रुपयाने खरेदी करते. फेडरेशनकडील दुधाला कर्नाटक सरकार प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देते.  हे दूध फेडरेशनमार्फत नंदिनी या नावाने विक्री केले जाते.  महाराष्टÑात सगळीकडे नंदिनी गाईचे दूध पिशवीतून प्रतिलिटर ४० रुपयाने विक्री केले जाते. 

पावडर आणि बटरचे दर वाढले आहेत. ते ३१ रुपयाने दूध खरेदी करीत आहेत. आम्ही सध्या गाईचे दूध २९ रुपयाने खरेदी करीत असलो तरी आगामी काळात खरेदी दरात वाढ होईल. दूध संकलन मोठ्या प्रमाणावर घटले असून वाढण्याची शक्यता कमीच आहे.- गोपाळराव मस्केअध्यक्ष, राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघ

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाmilkदूधMarketबाजार