शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अत्याचार पीडित स्त्रियांसाठी मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन केंद्र ग्रामीण भागात देखील सुरु करावे - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 21:05 IST

पुणे जिल्ह्याचा वार्षिक योजना २०१८-१९ आढावा राज्यस्तर बैठक काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित केली होती. याबैठकीत पुणे जिल्ह्यातील वार्षिक खर्चाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आ.डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. 

मुंबई:  पुणे जिल्ह्याचा वार्षिक योजना २०१८-१९ आढावा राज्यस्तर बैठक काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित केली होती. याबैठकीत पुणे जिल्ह्यातील वार्षिक खर्चाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आ.डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. भारत सरकारने आर्थिक पाहणी अहवाल गुलाबी रंगात प्रकाशन करून मुलींची कमी होणारी संख्या गांभिर्याने घेत असल्याचे नमूद केले व त्याचा तपशीलही ऊघडपणे मांडून समस्येची दखल घेतली. यांचे स्वागत आ.गोऱ्हे यांनी केले. तसेच महाराष्ट्र सरकारने देखील मुलींच्या संख्येत होणारी घट गंभीरपणे घेऊन येणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्प गुलाबी रंगात प्रकाशित करण्याबाबत सूचना केली होती त्यास तात्काळ अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सकारात्मक घेऊन मान्य करून सचिवांस तसे आदेशही दिले.शाश्वस्त विकासाची १७ उद्दिष्टे हे प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात यावी यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत दि. १० ऑक्टोबर, २०१७ रोजी निर्णय घेण्यात आला होता. याचा एक म्हणून पुणे जिल्हाअधिकारी यांनी जिल्हा नियोजनात समावेश केला आहे परंतु इतर जिल्ह्यात शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांचा समावेश करून हवामान बदल या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची मागणीही आ.गोऱ्हे यांनी केली. अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने भविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जोडणारे रस्ते सुस्थितीत करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला त्यावर अर्थमंत्री यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास रस्ते दुरुस्ती बाबत निर्देश दिले आहेत. स्त्री पुरुष समान संधी व समान वेतन आयोग राज्य स्तरावर निर्माण करण्याची ही मागणी आ.गोऱ्हे यांनी मांडली यावर सकारात्मक प्रतिसाद अर्थमंत्री यांच्याकडून प्राप्त झाला आहे.मुंबई , पुणे व नाशिक येथील घाटी, मेयो, सायन या सारख्या हॉस्पिटलमध्ये समुपदेशन अत्याचार पीडित स्त्रियांना उपलब्ध आहेत. परंतु मराठवाडा, विदर्भातील  याठिकाणी अत्याचार पीडित स्त्रियांसाठी मानसिक आधार देण्यासाठी कोणत्याच प्रकारचे समुपदेशन केंद्र उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आ.गोऱ्हे यांनी ग्रामीण हॉस्पिटलमध्ये देखील समुदेशक, मानसविश्लेषण तज्ञ यांची पदे भरण्याबाबत संबधित विभागास सूचना तसेच निधीची तरतूद करण्याची मागणी केली. या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य अर्थमंत्री दीपक केसरकर यांनी यामागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन  अंमलबजावणी बाबत प्रयत्नशील आहेत असे सांगितले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे