शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

खर्च ३५० रुपये, फायदा ५० हजारांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:57 IST

ग्रासरुटइनोव्हेटर : अशोक पाटील भोसकर यांनी वेगळे काही तरी करायचे जेणेकरून पैसा वाचेल, ठिबकचे आयुष्यही वाढेल, असा निश्चय केला.

- गोविंद शिंदे (बारूळ जि.नांदेड)

बाचोटी, (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी अशोक पाटील भोसकर यांनी केलेल्या प्रयोगातून ठिबकचे आयुष्यमान १० वर्षांनी वाढले. याशिवाय जमीन व पिकांचेही नुकसान टळले. त्यांनी केवळ ३५० रुपये खर्च करून ठिबकचे नूतनीकरण केले. यात त्यांना एक नव्हे, दोन नव्हे सुमारे ५० हजारांचा फायदा झाला. त्यांच्या या प्रयोगाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली आहे.

पाण्याची बचत आणि पिकाला पुरेसे पाणी मिळण्यासाठी सध्या प्रत्येक शेतकऱ्याकडे ठिबकद्वारे सिंचन केले जाते. ठिबकद्वारे पिकाला पाणी, विविध प्रकारची खते, विविध प्रकारची औषधी सोडली जातात. त्यामुळे ठिबकचा वापर ४ वर्षांपेक्षा जास्त करू शकत नव्हते. कारण सर्व प्रकारची औषधे, खतामुळे ठिबकचे छिद्र बंद पडून खराब होत होते. त्यामुळे ठिबकचे आयुष्यमान जास्तीत जास्त ४ वर्षे टिकत होते. यातून धडा घेत अशोक पाटील भोसकर यांनी वेगळे काही तरी करायचे जेणेकरून पैसा वाचेल, ठिबकचे आयुष्यही वाढेल, असा निश्चय केला.

त्यांनी शेतात दोन लाकडी खांब उभे करून ३ इंची पीव्हीसी पाईप ४० फुटांच्या अंतराने दोन्ही खांबांना बांधून अर्धचंद्र आकारात तयार केले. त्यात सात लिटर अ‍ॅसिड सोडून प्रत्येक ठिबकचा पाईप एका बाजूला सोडून दुसऱ्या बाजूने काढून घेत होते. त्यामुळे अ‍ॅसिड प्रमाण ठिबकच्या नूतनीकरणास उपयोगाला आले. जे ठिबक ४ वर्र्षे वापरत होते, ते आज १० वर्षांपर्यंत वापरता येते.

या शेतकऱ्याने केवळ ३५० रुपयात ७ लिटर अ‍ॅसिड खरेदी केले, उर्वरित सर्व साहित्य शेतातीलच वापरले. आजघडीला ५० ते ६० हजार रुपये खर्चून ठिबक खरेदी करावे लागत होते, ते या प्रयोगामुळे गरज पडली नाही. भोसकर यांना २२ एकर शेती असून, त्यातील ११ एकर ठिबक सिंचनाची आहे. त्यांच्या शेतात सध्या हळद, ऊस, कापूस असून, शेताच्या बांधावर आवळा, बांबू, साग आदींचे ते उत्पादन घेतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी