शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

मी २५ दिले होते, ५० महाजनला द्यायला सांगितलेत; RTO घोटाळ्याचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 11:28 IST

नंदूरबारचे डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई- राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मात्र नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे. नाशिक पोलिसांनी आरटीओ घोटाळ्याबाबत त्यांच्या हद्दीपुरती क्लीन चिट दिलेली असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. 

नंदूरबारचे डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव टेबलवर मोठी रक्कम ठेवून बोलत काही जणांशी बोलत असतानाचा हा व्हिडिओ आहे. कनिष्ठ आरटीओ खडसे आणि भोई यांच्याकडून पैशाचा कथित हिशोब ते मागत असल्याचे दिसते. बच्छाव यांनी तो पैसा स्वीकारलेला नाही, पण १० लाख रुपयांची मागणी करताना दिसतात. हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा असला तरी आरटीओतील घोटाळ्यांच्या निमित्ताने त्याची चर्चा सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याच एका सहकाऱ्याने तयार केला होता. 'हा व्हिडिओ म्हणजे माझ्याविरुद्धचा कट आहे. तो मोडूनतोडून तयार केलेला आहे', असे बच्छाव यांचे म्हणणे आहे.

परिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासाराज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी वर्गांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. 27 मे पासून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरवड्यात चौकशी पूर्ण केली आहे. या दरम्यान राज्याच्या अवर सचिव, उपसचिवांपासून नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओची कामे करणारे खासगी व्यक्ती आणि तक्रारदार असे सुमारे 35पेक्षा अधिक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीपासून यामध्ये क्लिष्टता, गुंतागुंत आढळून येत होती.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस