शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेतीचे आरोग्य सुधारणार!

By admin | Updated: January 22, 2017 03:04 IST

संशोधन, तंत्रज्ञानाच्या शिफारशीची अंमलबजावणी आवश्यक ; राष्ट्रीय कोरडवाहू कार्यशाळेचा समारोप.

अकोला, दि. २१- भरघोस उत्पादनासाठी मातीचे आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. मातीचे आरोग्य सुधारणे व कमी पाण्यात अधिक उत्पादन येण्यासाठीच्या संशोधनावर सक्षमतेने भर दिला असून, एकात्मिक शेती पद्धती व शिफारशी केलेल्या तंत्रज्ञान, संशोधनाची प्रत्यक्ष शेतावर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन शनिवारी (आयसीएआर)भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. एस. भास्कर, दिल्ली यांनी केले.अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत १७ राज्यातील १४0 कृषी शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. २१ जानेवारीला कार्यशाळेचा समारोप झाला. या कार्यक्रमाला डॉ.एस.भास्कर, हैदराबाद येथील डॉ.के.पी.आर. विठ्ठल, डॉ.सुब्बाराव, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्ही. एम. मायंदे, आंध्रप्रदेश, प्रकल्प समन्वयक डॉ. रवींद्र चारी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.भास्कर यांनी मातीच्या सुधारणेसह एकात्मिक शेती पद्धतीवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. शेतकर्‍यांनी कुक्कुट, शेळीपालन, दुग्ध व्यवसायाची शेतीला जोड द्यावी लागणार आहे. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनही काटेकोर करावे लागणार असून, पाणी अडवून जिरवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.डॉ. नागदेवे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात योणार्‍या विविध कामांची माहिती दिली. विदर्भातील कोरडवाहू क्षेत्र आणि पावसाचे कमी झालेले दिवस बघता, शेतकर्‍यांनी पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. पाच दिवस कोरडवाहू शेती आरोग्य सुधारणा कार्यक्रमावर अधिक भर देण्याचे ठरविण्यात आले. कोरडवाहू शेतीला कसे शाश्‍वत करता येईल, कमी पाण्यात, खर्चात भरघोस पीक कसे घेता येईल,आदी विषयांवर कोरडवाहू या विषयाच्या कृषी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म मंथन केले. भारतातील ४५ टक्के शेती कोरडवाहू असून, ५0 टक्के लोकसंख्या ही कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. कोरडवाहू शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जात उत्पन्न कसे वाढविता येईल, यासाठी शास्त्रज्ञांद्वारे निर्मित तंत्रज्ञान कोरडवाहू शेती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तार कार्यावर अधिक भर देताना त्यासाठीचे अनेक विषय शास्त्रज्ञांनी हाताळले. अनेक शिफारशी तयार करण्यात आल्या. समारोपाला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.