शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना खूश करण्यासाठी नगरसेवक सरसावले

By admin | Updated: September 20, 2016 02:22 IST

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच नगरसेवक कामाला लागले आहेत.

शेफाली परब-पंडित

मुंबई- महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच नगरसेवक कामाला लागले आहेत. मतदारराजाला खूश करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. यामुळे मतदारांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मागण्या येऊ लागल्या आहेत. मुंबईतील झोपड्यांची १९ फुटांपर्यंत उंची वाढविण्याची मागणी चर्चेत असताना आता टोल करमाफी, भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या १९९१ नंतरच्या इमारतींना सूट असे प्रस्ताव पुढे आले आहेत.फेबु्रवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक आहे. यावेळी आरक्षणाबरोबरच वॉर्डांची फेररचना होणार असल्याने नगरसेवक धास्तावले आहेत. आरक्षणात आपला वॉर्ड गेल्यास अन्य पर्यायही चाचपण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. तर आपली छाप पक्ष आणि मतदारांवर पाडण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यातूनच मतदारराजाला फायदा करून देणाऱ्या एकापेक्षा एक मागण्या होऊ लागल्या आहेत. मुंबईतील झोपड्यांना १९ फुटांपर्यंत उंची वाढविण्याची परवानगी देण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यानंतर आता करदात्यांच्या वाहनांनाही मुंबईमध्ये ये जा करण्यासाठी टोल आकारू नये, अशी मागणी काँग्रेसमधूनच पुढे आली आहे. शिवसेनेने यापुढे जात १९९१ नंतरच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची मागणी केली आहे. या सर्व मागण्या पालिका महासभेच्या पटलावर एकाचवेळी मंजुरीसाठी येणार आहेत. >झोपड्यांची उंची वाढवण्याचा प्रस्ताव : टोलमुक्तीची मागणी मुंबईत झोपड्यांची उंची १४ फुटांपर्यंत वाढविण्याची परवानगी आहे. मात्र क्वचितच एखाद्या झोपडीला अशी परवानगी मिळते, असा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच झोपड्यांना १९ फुटांपर्यंत उंची वाढविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली आहे. काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी टोलकरामधून जशी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व अधिकाऱ्यांना सूट मिळते. त्याप्रमाणे करदात्यांच्या वाहनांनाही मुंबईत ये-जा करण्यासाठी टोल आकारू नये, अशी मागणी पालिकेच्या महासभेपुढे ठेवली आहे.भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या हजारो इमारती मुंबईत आहेत. या इमारतींमधील रहिवाशांकडून पाणीपट्टी, मालमत्ता कर व इतर कर नियमित दरापेक्षा जादा दराने वसूल केले जातात. भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम विकासकाचे असल्याने या रहिवाशांना भुर्दंड का, १९ आॅगस्ट २००४ रोजी महापालिकेने १९९१ पूर्वीच्या इमारतींचे विशिष्ट शुल्क, दंड, आकार कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यास नगरविकास खात्यानेही मंजुरी दर्शविली होती. हीच सूट १९९१ नंतरच्या मात्र भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांनी केली आहे.