शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

राज्यामध्ये आता ‘कॉर्पोरेट’ शाळा! विधानसभेची मंजुरी : खासगी कंपन्यांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:27 IST

राज्यातील जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना, दुसरीकडे आता कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसे विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर झाले आहे.

नागपूर : राज्यातील जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना, दुसरीकडे आता कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसे विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर झाले आहे.‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर या शाळांना मंजुरी दिली जाणार आहे. अनेक कंपन्यांकडे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी असतो. कंपन्या संबंधित निधी लोकोपयोगी कामांवर खर्च करण्यासाठी विविध ट्रस्टला देतात. काही कंपन्यांचे असे म्हणणे होते की, वेगळे ट्रस्ट उघडून निधी खर्च करण्यापेक्षा कंपन्यांनाच शाळा उघडण्याची परवानगी दिली तर आम्ही आमच्याच शाळांवर थेट निधी खर्च करू. या विनंतीचा सकारात्मकपणे विचार करण्यात आला. चंद्रपूरसारख्या खाणीच्या पट्ट्यात समजा वेस्टर्न कोलफिल्ड लि. ने शाळा सुरू केली तर त्याचा फायदा तेथील स्थानिक विद्यार्थ्यांनाच होईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.चर्चेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित शाळांमध्ये १ ली ते १२ वी पर्यंत मराठीची सक्ती करण्याची मागणी केली. शेकापचे पंडितशेठ पाटील यांनी अंबानी, अदानी शाळा उघडतील, अशी टीका करीत गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवेश देण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी केली. शशिकांत शिंदे यांनी कंपन्यांना शाळांद्वारे पैसा कमविण्याची संधी सरकार देत असल्याचा आरोप केला.अशा आहेत तरतुदी -कंपनी कायद्याअंतर्गत या शाळांना मंजुरी दिली जाईल.संहितेचे नियम लागूशिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागतील.महापालिका व 'अ' वर्ग, नगरपालिका क्षेत्रात नवीन शाळा स्थापन करण्यासाठी ५०० चौ.मी. चे जमिनीचे क्षेत्रफळ आवश्यक.मराठी व सर्व भाषेच्या शाळा सुरू करता येतील.शाळांसाठी मैदाने आवश्यक. नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांशी मैदानांचा करार करावाशैक्षणिक पात्रतेची अटी पूर्ण करणे आवश्यककंपनीची शाळा बंद पडली तर सरकारी प्रशासक नेमला जाईल व ती दुस-या संस्थेत हस्तांतरित होईल.इंटरनॅशनल बोर्डाच्या १०० शाळाराज्य सरकारतर्फे इंटरनॅशनल बोर्डाच्या १०० शाळा सुरू केल्या जातील, अशी घोषणा शिक्षणमंत्री तावडे यांनी केली. या शाळादेखील मराठीसह सर्वच माध्यमांच्या असतील. यामुळे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शाळा उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.पळशीकर समितीचा अहवाल सादरशाळांमधील भरमसाठ फी वाढीसंदर्भातच्या नियुक्त केलेल्या पळशीकर समितीने अहवाल सरकारला सादर केला आहे. येत्या अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर शुल्क नियंत्रण कायदा अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :SchoolशाळाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार