शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कॉर्पोरेट कार्यालयं १०० टक्के बंद होणार?; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 14:07 IST

Coronavirus लोकल, मेट्रोमधील गर्दी टाळण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई: राज्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. लोकल आणि मेट्रोमधील गर्दी टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची हमी त्यांनी दिली. लोकल, मेट्रो सेवा बंद करण्याचा विषय थेट आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबद्दलचा निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबईत एका ६३ वर्षीय व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांची माहिती दिली. देशभरातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १३४ इतकी आहे. यातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती संवेदनशील असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. खासगी कंपन्यांनी शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी. यासंदर्भात २० ते २५ कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. लोकल, मेट्रोतील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत टोपेंनी दिले. खासगी कार्यालयं बंद करण्यासंदर्भात कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा असून या कंपन्या सहकार्य करण्यास तयार आहेत. कॉर्पोरेट आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कंपन्यांसोबत चर्चा झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कॉर्पोरेट सेक्टर बंद करण्याबद्दल चर्चा झाली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बहुतांश जण फेस मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करत आहेत. याचा गैरफायदा घेऊन बोगस, दुय्यम दर्जाची उत्पादनं बाजारात आणली जात आहेत. अशांवर एफडीएच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस