प्रशासकीय इमारत २३ कोटींची : १५ महिन्यात पूर्ण होणार नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड, लेन्ड्रा येथे सुरू असून बांधकाम १५ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर बांधकाम सुरू आहे. नासुप्रने निविदा आमंत्रित करून कामाचा कार्यादेश कंत्राटदाराला दिला आहे. या कामाचा अपेक्षित खर्च २३ कोटी रुपये आहे. नागपूर मेट्रो प्रकल्प हा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे या कार्यालयाचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण करण्याचा नासुप्रचा मानस आहे. ही इमारत सात मजली (तळमजला व सहा मजले) असून सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. या इमारतीच्या चारही बाजूला लॅण्ड स्क्रेपिंग, हिरवळ आणि वृक्ष लावण्यात येणार आहे. या कार्यालयातून नागपूर मेट्रो रेल्वेची महत्त्वपूर्ण कामे करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प निकडीचा सार्वजनिक आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. ३० जानेवारी २०१४ रोजी शासनाने आणि २१ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारने नागपूर रेल्वे प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे.(प्रतिनिधी)प्रशासकीय इमारतीची रचनाभूखंडाचे क्षेत्रफळ ६३५९.८४ चौरस मीटर४०५५.४४ चौरस मीटर तळघर व तळमजल्यावर ११२ कार, २३४ स्कूटर व २२४ सायकलसाठी पार्किंग.पहिला ते पाचव्या मजल्यावर प्रत्येकी ९१२ चौरस मीटर क्षेत्रात कार्यालय.सहा मजल्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० चौरस मीटर क्षमतेचे आॅडिटोरियम असे एकूण २०१३ चौरस मीटर.
मेट्रोच्या आॅफिसला कॉर्पोरेट लुक
By admin | Updated: February 3, 2015 01:06 IST