शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: व्हीनस, मॅग्नम कंपन्यांनी केली मास्कची साठेबाजी; शासनाच्या समितीने ठेवला गंभीर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:26 IST

CoronaVirus face mask News: भारतात एन ९५ मास्क बनवणाऱ्या व्हिनस आणि मॅग्नम या दोन मोठ्या कंपन्या आहेत. नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ऑक्यूपेशनल सेफ्टी अ‍ॅन्ड हेल्थ ही अमेरिकेची मास्क प्रमाणित करणारी मान्यताप्राप्त संस्था आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : व्हीनस आणि मॅग्नम या दोन कंपन्यांनी साठेबाजी करून वस्तूंची कृत्रिम भाववाढ केली. ही बाब कायद्याचा भंग करणारी आहे, त्यामुळे विविध कायद्यांअंतर्गत सक्षम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस मास्कचे दर ठरवणाºया समितीने केली आहे.मास्कची साठेबाजी करून नफा कमावण्याचा व्हीनस कंपनीचा हेतू होता, चौकशीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यास या कंपनीने मुद्दामच विलंब केला, वारंवार विनंत्या व स्मरणपत्रे देऊनही त्यांनी जाणीवपूर्वक विलंब केला, कॉस्ट ऑडिटरने व चौकशीसाठी गेलेल्या अधिकाºयांनी मागितलेली माहिती जतन करणे, निदर्शनास आणणे व सादर करणे बंधनकारक असताना कंपनीने तसे केले नाही, अशा अनेक गंभीर बाबी समितीने समोर आणल्या आहेत.भारतात एन ९५ मास्क बनवणाऱ्या व्हिनस आणि मॅग्नम या दोन मोठ्या कंपन्या आहेत. नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ऑक्यूपेशनल सेफ्टी अ‍ॅन्ड हेल्थ ही अमेरिकेची मास्क प्रमाणित करणारी मान्यताप्राप्त संस्था आहे. या दोन कंपन्या एन ९५ मास्कचे उत्पादन या कंपनीच्या प्रमाणित मास्कचे उत्पादन करतात. त्यामुळे त्यांची यात मक्तेदारी आहे. या उत्पादनांच्या किंमतीमध्ये दोन मोठ्या उत्पादकांनी केलेल्या वाढीचा आलेख व त्यांची साधलेली वेळ पहाता या दोन कंपन्यांनी साठेबाजी करुन वस्तूंची कृत्रीम भाववाढ केली व ही बाब स्पर्धांच्या कायद्याचा भंग करणारी आहे, त्यामुळे विविध कायद्यांअंतर्गत सक्षम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणावी असेही समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. व्हिनस कंपनीने तपासात कोणतेही सहकार्य केले नाही. मागितलेली माहिती दिली नाही, असेही अहवालात म्हटले आहे.भाववाढ अवास्तव : मास्क आणि सॅनिटायझर यांच्या बहुतांश कच्च्या मालांच्या किंमती अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली नियंत्रित करुन देखील या उत्पादक कंपन्यांनी मास्कच्या किंमती अवास्तव व अतार्किक प्रमाणात वाढवल्या. मास्कच्या कमाल किंमतीत २५ ते १७२ रुपये अशी वाढ छोट्या व मध्यम रुग्णालयांच्या, तसेच सामान्य जनतेच्या क्रयशक्तीच्या पलीकडे आहे. अशाप्रकारची तीव्र वाढ अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या मूलभूत तत्वांच्या विरोधी असल्याचे समितीने म्हटले आहे.राजकीय लागेबांधेमास्क बनवण्यासाठी लागणाºया कच्च्या मालाच्या किमतीत कुठेही वाढ झालेली नसताना या दोन कंपन्यांनी मास्कच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. यातल्या एका कंपनीचे राजकीय पक्षाच्या नेत्याशी लागेबांधे असल्यामुळे या गोष्टी होत गेल्या, असेही एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या