शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : राज्यात ४,१४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 22:12 IST

Coronavirus Update In Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर.

ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून सरकारही सावधतेनं पावलं उचलताना दिसत आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमदेखील राबवली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 

गेल्या चोवीस तासांत राज्यात ४,१७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे राज्यात ४,१५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८ हजार ४९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.०९ टक्के इतरा झाला आहे. राज्यात सध्या ४७,८८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.  मुंबईत रुग्णसंख्या वाढलीमुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ५३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ३,८९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी आता १२५३ दिवस इतका झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई