शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांपार, राज्यात अद्याप ५३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण

By बाळकृष्ण परब | Updated: January 9, 2021 22:12 IST

coronavirus News : राज्यातील कोरोनाच्या फैलावाचा आकडा आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यात सापडले कोरोनाचे ३ हजार ५८१ नवे रुग्ण राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचली आहे. तर याच काळात ५७ जणांचा मृत्यू दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ जणांनी कोरोनावर मात केली

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या फैलावाचा आकडा आता बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र असे असले तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५० हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ५८१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचली आहे. तर याच काळात ५७ जणांचा मृत्यू झाला. या दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे ५२ हजार ९६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून, कोरोनाचे रुग्ण आणि एकूण कोरोना बळींमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या एक दोन महिन्यांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून, कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचे संकेत मिळत आहे.दरम्यान, देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे आठ लाख आरोग्य सेवकांना पहिल्या टप्प्यामध्ये कोरोनाविरोधातील लस दिली जाईल. तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईHealthआरोग्य