शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

CoronaVirus : ...म्हणून वास घेण्याची क्षमताही होते कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 06:34 IST

कुठल्याही संसर्गामध्ये चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर (घ्राणशक्ती) थोडा परिणाम होत असतो; पण तो न जाणवण्याइतपत असतो. कोरोना विषाणूच्या संसर्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतोे.

- डॉ. अमोल अन्नदाते,‘कोविड-१९’ संसर्गाच्या लक्षणांपैकी ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, सर्दी ही लक्षणे सोडून अजून एक महत्त्वाचे लक्षण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. ते म्हणजे अचानक वास घेण्याची क्षमता कमी होणे. कुठल्याही संसर्गामध्ये चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर (घ्राणशक्ती) थोडा परिणाम होत असतो; पण तो न जाणवण्याइतपत असतो. कोरोना विषाणूच्या संसर्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतोे. ही क्षमता चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही वासांसाठी कमी होते. यात सर्वप्रथम जेवण करताना त्याचा सुवास न जाणवणे, अंघोळ करताना साबणाचा किंवा टाल्कम पावडरचा वास न जाणवणे... अशी लक्षणे सहज लक्षात येणारी आहेत.वास येणे पूर्णपणे बंद होणे किंवा वास येणे कमी होणे, अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये संसर्ग होण्याचे हे पहिले लक्षण असू शकते. पण यासोबत ताप, खोकला ही लक्षणे असतातच. परदेशात मात्र काही रुग्णांमध्ये इतर कुठलीही लक्षणे सोडून फक्त घ्राणशक्ती कमी होणे एवढे एकच लक्षण आढळले आहे. भारतात यावर अजून माहिती येण्यास वेळ लागेल.कोरोना संसर्गातून रुग्ण बरा झाला की वास घेण्याची क्षमता पूर्ववत होते. हे लक्षण महत्त्वाचे यासाठी वाटते, की ‘कोविड-१९’ सोडून इतर व्हायरल आजार व फ्लूमध्ये हे जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. म्हणून ताप, सर्दी, खोकला या लक्षणांसोबत वासाची क्षमता कमी झाली असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या.नाकामध्ये पॉलीप म्हणजे लटकणारे गुच्छ असणे, अ‍ॅलर्जीमुळे असणारी दीर्घकालीन सर्दी, नाकातील हाड वाढलेले असणे, नाकाच्या मधला पट वाकडा असणे या आजारांमध्येही घ्राणशक्ती कमी होते; पण त्या कुठल्याही आजारामध्ये ताप नसतो.(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस