शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : वांद्र्यातल्या गर्दीवर शरद पवारांचं भाष्य, म्हणाले ती घटना दुर्दैवीच; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 12:42 IST

कोरोनाचा परिणाम दोन वर्ष कायम राहणार असून, भविष्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढणार असल्याचे संकेत पवारांनी दिले आहे. 

मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्राबरोबर राज्य सरकार समन्वय साधून कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु राज्यातलं कोरोनाग्रस्तांचं प्रमाण दिवसागणिक वाढतच चाललं आहे. त्यात काल वांद्र्यात परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात जमले होते. या सर्व घडामोडींवर शरद पवारांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. कोरोनाचा परिणाम दोन वर्षेही कायम राहणार असून, भविष्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढणार असल्याचे संकेत पवारांनी दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असला तरी त्यांच्या प्रवासाची सोय करू शकत नाही. मात्र त्यांच्या जेवणाची खबरदारी सरकार, सेवाभावी संस्थांनी घेतली आहे. ज्यामुळे त्यांची उपासमार होणार नाही, असंही पवार म्हणाले आहेत. उद्योग जगतानं कामगारांची काळजी घेतली पाहिजे. 3 मेपर्यंत संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे. सरकार धीराने काम करत आहे, योग्य नियोजन करून कोरोनाचा सामना करणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी आहे.जी उपाययोजना करायची आहे, ती सगळी पावलं टाकली जात आहेत, वैद्यकीय खबरदारी घेतली जातेय, अन्न-धान्याची पूर्तता, कष्टकरी-कामगार वर्ग यांची काळजी घेतली जात आहे. वांद्रे स्टेशनजवळ घडलेला प्रसंग दुर्दैवी आहे, कुणीतरी रेल्वेबाबत अफवा पसरवली, डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत, जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. राजकीय पक्षांना आवाहन करतो की, राजकारण लोकशाहीत चालतच असतं, पण ही वेळ राजकारणाची नाही, देशावर गंभीर संकट आहे अन् प्रशासनावर ताण आहे, जे एकत्रितपणे काम करत आहेत, त्यांना सहकार्य करा, पक्ष विसरून सरकारला मदत करा, असं आवाहनही पवारांनी केलं आहे.   

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग बंद आहेत. अशातच कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येणार आहे. एवढचं नाहीतर शेतकऱ्यांवरही शेतीचा माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे परिणामही एक ते दोन वर्षांपर्यंत जाणवणार आहेत.' कोरोना संकटाचा अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. याबाबत आतापासूनच काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाशी संयमानं मुकाबला करणं आवश्यक आहे.' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस