शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Mob Lynching : कोरोनाच्या संकटात शरद पवार उद्या सकाळी संवाद साधणार; पालघरच्या घटनेवर काय बोलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:29 IST

पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. 

मुंबई- देशावर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला असतानाच राज्य सरकारकडून त्याला थोपवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. ठाकरे सरकारनं कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात नियमावलीच लागू केली आहे. काही प्रमाणात ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यांना सूट दिली असली तरी जिल्हाबंदीच कायमच आहे. परंतु या कोरोनाच्या काळात पालघरच्या घटनेनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. पालघर जिल्ह्यातील एका गावात दोन साधू आणि एका चालकाच्या झालेल्या हत्येमुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे. कोरोनाच्या  प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता शरद पवार फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असून, पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. शरद पवारांच्या भूमिकेला ठाकरे सरकारमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गेल्या वेळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी वांद्र्यातल्या प्रकारावर भाष्य केलं होतं. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असला तरी त्यांच्या प्रवासाची सोय करू शकत नाही. मात्र त्यांच्या जेवणाची खबरदारी सरकार, सेवाभावी संस्थांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 3 मेपर्यंत संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे. सरकार धीराने काम करत आहे, योग्य नियोजन करून कोरोनाचा सामना करणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी असल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योग बंद असून, अशातच कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येणार आहे. एवढंच नाहीतर शेतकऱ्यांवरही शेतीचा माल तसाच सोडून देण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले होते. येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे परिणामही एक ते दोन वर्षांपर्यंत जाणवणार आहेत.' कोरोना संकटाचा अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. याबाबत आतापासूनच काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाशी संयमानं मुकाबला करणं आवश्यक आहे.' असा सल्लाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला दिला होता. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या