शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट होणार?; अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 14:12 IST

coronavirus शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं अजित पवारांना पत्र; वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्याची मागणी

मुंबई: कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अर्थमंत्री अजित पवारांना पत्रदेखील लिहिलं आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांचा पगार दुप्पट करण्यात यावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. याशिवाय पोलिसांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्याचा आग्रहदेखील त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. देशातले २० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण राज्यात आहेत. वैद्यकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी वेतन दुप्पट करण्यात यावं, अशी मागणी ठाण्यातल्या ओवळा-माजिवाड्याचे आमदार आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्री अजित पवारांकडे केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विमा देण्याची मागणीदेखील सरनाईक यांनी केली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडू शकतो. हा भार कमी करण्यासाठी आमदारांच्या वेतनात कपात करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. सर्व आमदारांचा पगार ३० टक्के करण्याचा निर्णय याआधीच राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्यासाठी आणि पोलिसांना ५० लाखांचा विमा देण्यासाठी आमदारांच्या पगारात ५० टक्क्यांची कपात करण्यात यावी, असं सरनाईक यांनी अजित पवार यांना सुचवलं आहे.हरयाणा सरकारनं कालच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू, मेदांता मेडीसिटीचे संचालक डॉ. नरेश त्रेहन, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेससोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्यात आल्याची माहिती दिली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस