शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : उजळणी करा, ताण घेऊ नका; मानसिक तणावाखाली असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:08 IST

coronavirus : विद्यार्थ्यांना दहावीच्या एका पेपरची धाकधूक असणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य राखून उजळणी करावी म्हणजे त्या पेपरची भीती उरणार नाही. पालक यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात.

मुंबई : कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता शालेय शिक्षण विभागाकडून दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. एका पेपरसाठी ३१ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. मात्रर् ंविद्यार्थ्यांनी राहिलेल्या परीक्षेचा ताण न घेता पुढील महत्त्वाच्या परीक्षांची माहिती घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यास वेळ द्यावा, असे करिअर मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सुचविले आहे.आपत्कालीन परिस्थितीतही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेटाने, परिश्रमपूर्वक सुरू ठेवल्या होत्या. विविध पालक संघटना आणि शाळांकडून ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केल्यानंतरच या परीक्षांनाही स्थगिती द्यावी, अशी मागणी होत होती. या कारणास्तव अखेर एक पेपर बाकी असताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेला स्थगिती देऊन पुढील निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र दहावीचे वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष, आणि ही परीक्षा झाली की विद्यार्थ्यांचा मानसिक ताण आपोआप कमी होतो. मात्र लांबणीवर पडलेल्या पेपरचा अभ्यास किती दिवस आणि कसा करणार? इतके दिवस तोच अभ्यास सोडून इतर काहीच करता येणार नाही. यामुळे उगीचच अडकून पडलो, अशा प्रतिक्रिया दहावीच्या विद्यार्थ्यांकडून येत आहेत.विद्यार्थ्यांना दहावीच्या एका पेपरची धाकधूक असणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य राखून उजळणी करावी म्हणजे त्या पेपरची भीती उरणार नाही. पालक यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात. ते विविध उपक्रमातून सहज विद्यार्थ्यांची उजळणी करून घेऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना खास वेळ काढून अभ्यास करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना त्याचा ताणही वाटणार नाही. शिवाय ते इतर विषयांत आपला सकारात्मक वेळ गुंतवू शकतात, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ शीला साळवे यांनी दिला.या काळात पेपरचा मानसिक ताण घेण्याऐवजी पुढील आयुष्यात आपण तयारी करत असलेल्या क्षेत्राविषयी माहिती घेण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा, असे मत राजश्री मोरे या शिक्षिकेने व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसexamपरीक्षा