शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

CoronaVirus: आजपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल; थोडी सूट, काही निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 06:54 IST

‘ग्रीन’ व ‘ऑरेंज’ झोनमध्ये मिळणार सवलती; ‘रेड’ घोषित ठिकाणी कडक निर्बंध लागू राहणार

मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे. केवळ आँरेज आणि ग्रीन झोनमध्ये काही अटींसह या सवलत मिळतील. रेड झोन व बाधित क्षेत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनची बंधने लागू असतील. दिल्ली राज्य सरकारने मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हे निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला आहे.कोरोनाच्या चिखलात अडकलेले अर्थचक्र पुन्हा सुरू करीत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. राज्याप्रमाणे देशभरातही सोमवारपासून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होण्यात मदत होईल. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतू अर्थचक्र सुरु करतांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरु करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.सर्दी, तापाकडे दुर्लक्ष करू नकाबऱ्याचवेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुदेर्वाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत, अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही, अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण मोठ्या संख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.समुपदेशनासाठी दोन सेवा कार्यरतसध्या मानसिक अस्वस्थता वाढली असेल, समुपदेशनाची गरज असेल त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगरपालिका आणि बिर्ला इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईनचा नंबरही सांगितला. १८०० १२० ८२ ००५० असा तो नंबर आहे. याशिवाय आदिवासी विभागाने प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लता यांच्या संयुक्त विद्यमाने एक सेवा सुरु केली असल्याचे व त्याचा नंबर १८०० १०२ ४०४० असा आहे. सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यास स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. राज्यातील खासगी डॉक्टर्सशी आपण तसेच टास्कफोर्सचे डॉक्टरही बोलले असून त्यांची कोरोनाविरुद्ध लढायची तसेच दवाखाने उघडण्याची तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.केंद्र सरकार केवळ पाच किलो मोफत तांदूळ देत आहे. केंद्राने गहू आणि डाळी मोफत द्याव्यात अशी आमची मागणी आहे व ती पूर्ण होईल असा विश्वास आहे. केशरी कार्डधारकांना लवकरच सवलतीच्या दराने धान्य वितरित केले जाईल असे ते म्हणाले.हॉटस्पॉट असलेले जिल्हेमुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलङाणा, नाशिक, कोल्हापूर, अमरावती आणि पालघर जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट आहेत. तर, हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांत अकोला, लातुर, सातारा, रत्नागिरी उस्मामानाबाद, जळगाव, सिंधुदूर्ग, रायगड, बीड, हिंगोली, जालना, वाशिम, धुळे, सोलापूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे कोरोना हॉटस्पॉट नसले तरी एखाद दुसरे अथवा तुरळक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यात अजिबातच कोरोनाचे रूग्ण आढळून आले नाहीत त्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश केला आहे.

आजपासून या सेवा सुरूई-कॉमर्स कंपन्यांना फळे वैद्यकीय साहित्य इत्यादींची डिलीव्हरी देता येईल. लॉकडाउनमुळे अडकलेले पर्यटक किंवा नागरिकांची राहण्याची व्यवस्था करणारी हॉटेल्सफरसाण किंवा तत्सम पदार्थांची आणि मिठाईची दुकाने (आत बसून खाण्यास परवानगी नाही.)नगरपालिका आणि महानगरपाालका क्षेत्राच्या बाहेरील भागातील ग्रामीण भागातील उद्योग, वीट भट्ट्या,रस्ते, जलसिंचनाची कामे, औद्योगिक प्रकल्पातील सर्वप्रकारच्या इमारतींची बांधकामेअत्याचारग्रस्त महिलांनी १०० नंबरवर फोन करावाबराच काळ घरी राहिल्याने मानसिक स्थिती थोडीफार इकडे तिकडे होते. परंतु लॉकडाउन आहे म्हणून पुरुषांनी घरात महिलांना त्रास देणे योग्य नाही.असा अत्याचार होत असल्यास महिलांनी १०० नंबरवर फोन करून पोलिसांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.वृत्तपत्रांवर बंदी नाही पण...मुख्यमंत्री म्हणाले की, वृत्तपत्रांवर बंदी नाही. स्टॉलवर पेपर उपलब्ध केले तर हरकत नाही. मुंबई, पुणे येथे खासकरून रेड झोन आहे. तिथे घरोघरी वृत्तपत्र टाकू देणे योग्य वाटत नाही.६७ हजार चाचण्यांपैकी ९५ टक्के निगेटिव्हराज्यात जवळपास ६७ हजार चाचण्या करण्यात आल्या. यातील ९५ टक्के केसेस निगेटिव्ह आल्या. साधारणत: ३६०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.३०० ते ३५० रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी सुखरूप गेले आहेत, ही समाधानाची बाब आहे. ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे आहेत वा लक्षणेच दिसत नाहीत. ५२ रुग्ण मध्यम ते अतिगंभीर आहेत.आजपासून या सेवा सुरूशेती : शेतीविषयक कामे, शेती व बागायती कामांसाठी साहित्याची विक्री व उत्पादन, कृषिमाल खरेदी केंद्रे,मत्स्य व्यवसाय, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री, पोल्ट्री फार्म, हॅचरीज, पशुखाद्य निर्मिती प्रकल्पबँकिंग आणि पतपुरवठाबँक शाखा आणि एटीएम, कॅश मॅनेजमेंट एजन्सिज, इन्शुरन्स कंपनी, सहकारी पतसंस्था.मनरेगा : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मजुरांना ही कामे करता येतील.जीवनावश्यक वस्तूंची विक्री, वाहतूक आणि साठवणूक. दुकाने उघडण्याची किंवा बंद करण्याच्या वेळेचे कोणतेही बंधन नाही.गॅरेज व धाबेट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरू करण्यास परवानगीइंधन विक्री आणि वाहतूकपेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन व गॅसची वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्रीपोस्टल, कुरिअर सेवा, दुरध्वनी, इंटरनेट सेवाब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा५० टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवाकमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्सहे सर्व मात्र बंदच राहीलमेट्रो व लोकलसह रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूकरस्ता मार्गाने होणारी खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूकटॅक्सी, रिक्षा व ओला-उबरसारख्या अ‍ॅपआधारित प्रवासी सेवासर्व शाळा, कॉलेजे, विद्यापीठे, अन्य प्रशिक्षण संस्था व कोचिंग क्लाससर्व धार्मिक व प्रार्थनास्थळेवैद्यकीय कारणांखेरीज लोकांचे आंतरजिल्हा व आंतरराज्य येणे-जाणेदेशांतर्गत सर्व विमान वाहतूकसामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक यासहगर्दी होईल असा अन्य कोणताही कार्यक्रमविशेष परवानगी दिलेल्यांखेरीज अन्य व्यावसायिक व औद्योगिक आस्थापनेविशेष परवानगी दिलेल्यांखेरीज सर्व निवासी हॉटेल, लॉज, बोर्डिंग हाऊस व वसतिगृहांसह ‘हॉस्पिटॅलिटी’ उद्योगसर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सेमिनार स्थळे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा व जिम, स्वीमिंग पूल, उद्याने, थीम पार्क, बार आणि उपाहारगृहेअंत्ययात्रेला जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या