शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus कोरोनामुळे रेल्वे रद्द झाली; प्रवाशांना पैसे परत मिळू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 07:20 IST

२१ लाख प्रवाशांना दिले एकूण १३४ कोटी : मुंबई विभागातून ६३ कोटींचा परतावा

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एक्स्प्रेस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा पश्चिम रेल्वेकडून दिला जात आहे. १ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागातून एकूण २१ लाख २३ हजार प्रवाशांना १३४ कोटी ४८ लाख रुपयांचा तिकीट परतावा केला आहे. याच कालावधीत मुंबई विभागातून ९ लाख प्रवाशांना पश्चिम रेल्वेने ६३ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. लॉकडाउनमुळे भारतीय रेल्वे मार्गावर एकही प्रवासी वाहतूक सेवा सुरू नाही. प्रवाशांचा प्रवास रद्द होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांनी दोन-तीन महिन्यांअगोदर काढलेले तिकीट पश्चिम रेल्वेकडून रद्द केले जात आहे.

या प्रवाशांना तिकीट परतावा दिला जात आहे. १ मार्च ते ३१ मार्च कालावधीत २० लाख ९६ हजार प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे.परिणामी पश्चिम रेल्वेने या प्रवाशांना १३२ कोटी २५ लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे. तर मागील ४ दिवसात २२ हजार ४२७ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून २ कोटी २३ लाख रुपये परतावा देण्यात आला.

१ मार्च ते ४ एप्रिल कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण ९ लाख ३५ हजार ५०९ प्रवाशांनी तिकीट रद्द केले आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेने ६३ कोटी ४८ लाख रुपये परतावा केला आहे. १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ९ लाख २३ हजार ६४५ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ६२ कोटी ४९ लाख रुपये परतावा देण्यात आला. तर मागील ४ दिवसात ११ हजार ८६४ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ९८ लाख २४ हजार रुपये परतावा देण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या