शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाकरे सरकारनं आणखी मेहनत घेण्याची गरज; रेल्वेमंत्री गोयल पुन्हा बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 19:41 IST

गाड्यांची मागणी करतात, पण मजुरांचा तपशीलच देत नाहीत; गोयल यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी सोडल्या जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांवरून पुन्हा एकदा रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाकयुद्ध सुरू झालं आहे. केंद्र सरकार रेल्वे पुरेशा गाड्याच देत नाही, हा महाराष्ट्र सरकारचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. उलट आम्ही त्यांच्याकडे प्रवाशांची माहिती मागूनही महाराष्ट्र सरकारला ती देता येत नसल्याचं म्हणत गोयल यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार पलटवार केला आहे. ठाकरे सरकारला आणखी मेहनत घेण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.

महाराष्ट्र सरकारकडून खोटे आरोप केले जात आहेत. आम्ही ८० गाड्या मागत असूनही केवळ ३०-४० गाड्या मिळतात, हा आरोप धादांत खोटा आहे. आम्ही त्यांना १२५ गाड्या देऊ केल्या. त्यातून प्रवास करणाऱ्या मजुरांचा तपशील मागितला. मात्र त्यांना हा तपशील देता आला नाही. त्यांनी केवळ ४१ रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या मजुरांचा तपशील पुरवता आला, असं गोयल म्हणाले. महाराष्ट्राला १२५ रेल्वे गाड्यांचा प्रस्ताव दिला. त्यातही केवळ ४१ गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या मजुरांचा तपशील आम्हाला दिला गेला. यातल्याही अनेक गाड्यांमध्ये फारसे प्रवासी नव्हते. महाराष्ट्र सरकारला प्रवासी मजुरांची नीट काळजी घेता येत नाही. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे. त्यामुळे मजुरांच्या स्थितीबद्दल चिंता वाटते, असं गोयल यांनी म्हटलं.  महाराष्ट्र सरकारची मागणी लक्षात घेऊन आम्ही त्यांना रेल्वे गाड्या पुरवल्या. आज दुपारी ३ पर्यंत ५० गाड्या सुटायला हव्या होत्या. मात्र केवळ १३ गाड्या सुटल्या. कारण राज्य सरकारनं आम्हाला मजुरांचा तपशीलच दिला नाही. अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी राज्य सरकारनं संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्र सरकारनं आणखी उशीर करू नये. त्याचा परिणाम रेल्वेच्या जाळ्यावर आणि नियोजनावर होईल, असं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 

महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात!केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpiyush goyalपीयुष गोयलUddhav Thackerayउद्धव ठाकरे