शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: क्वारंटाईन सेंटर करता येईल तंत्रस्रेही अन् लोकस्रेही; तरुणांनी तयार केले डिझाईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 23:36 IST

केंद्र तसेच राज्य सरकारला प्रस्ताव सादर

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : सध्याची विलगीकरण कक्षांची बिकट अवस्था लक्षात घेता स्मार्ट सिटी प्रकल्पात यापूर्वी कार्यरत असलेले ईशान केसकर यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने विलगीकरण कक्ष ‘तंत्रस्रेही’ आणि ‘लोकस्रेही’ कसे होतील, यासंबंधीचा प्रकल्प डिझाईन केला आहे. मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून विलगीकरणात जात असलेल्या नागरिकांना आधीच माहिती मिळेल व कोणत्या सुविधा पुरवता येतील, अशी अनोखी संकल्पना मांडली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री कार्यालय यांना याबाबत माहिती देणारे ई-मेल पाठवले आहेत. ट्विटरच्या माध्यमातूनही शासनाला याचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही हा प्रकल्प सादर केला असून, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये महापालिका आयुक्तांशी या संदर्भात बैठक होणार आहे.

पुढील काही काळात प्रत्येक राज्यातील किमान १०-१५ लाख लोकांना क्वारंटाईन करावे लागू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, विलगीकरण कक्षातील असुविधा लक्षात घेता, सामान्य लोकांच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. विलगीकरण कक्षातील असुविधा, समाजापासून दूर जाण्याची भीती, परिस्थितीबाबतची अनभिज्ञता, अनेक शंका आणि त्यातून येणारी नकारात्मकता यामुळे सामान्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूरगामी परिणाम टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊ शकतो, असे ईशान केसकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

केसकर म्हणाले, ‘‘सध्या शासनाला अनेक आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे विलगीकरणात दर्जेदार सुविधा देणे शक्य नाही. मात्र, चांगल्या खाटा आणि वैयक्तिक सामान ठेवण्यासाठी स्टोअरेजची सुविधा नक्कीच पुरवली जाऊ शकते. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून क्वारंटाईनची प्रकिया सुलभ केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला क्वारंटाईनसाठी कोणत्या ठिकाणी जायचे आहे, तेथे जाण्यासाठी वाहतुकीची काय व्यवस्था आहे अशी माहिती मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आधीच देता येऊ शकते. याच अ‍ॅप्लिकेशनमध्ये विविध भाषांमधील ई-बुक्स, आध्यात्मिक आशयाचे साहित्य, योगाची प्रात्यक्षिके, संगीत, समुपदेशन, सकारात्मक राहण्याचे उपाय अशी माहिती अपलोड करता येईल. यातून त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखले जाईल. क्वारंटाईन ही त्याला शिक्षा वाटणार नाही.’’कसे आहे डिझाइन?क्वारंटाईनचे ठिकाण, एकूण प्रक्रिया आणि कालावधी सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने ईशान केसकर, शुभम गांधी, नीरज जावळे, टेजल श्रोत्रिया, भैरुमल सुतार यांनी हे डिझाईन तयार केले आहे. कोव्हीड ड्युटीवर असलेले वैद्यकीय कर्मचारी, आपापल्या गावी परतणारे मजूर आणि विद्यार्थी, अतिसंक्रमित क्षेत्रातील नागरिक या सर्वांनाच या सुविधांचा उपयोग होऊ शकतो, अशा पद्धतीने ही संकल्पना मांडली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोणत्या सुविधा असाव्यात, करमणुकीची काय साधने असावीत, स्वच्छता कशी राखली जावी, अशा सर्व बाबी सोप्या चित्रांमधून वर्णन करण्यात आल्या आहेत. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्याची तयारीही दाखवली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार