शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: तासाहून अधिक वेळ वाचले जाते वृत्तपत्र; सर्वेक्षणातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:02 IST

लॉकडाउनकाळात वृत्तपत्रांच्या वाचनाचा वेळही वाढला

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाउनच्या काळात विश्वासार्ह माहिती व बातम्यांसाठी लोक वृत्तपत्रांनाच अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच सध्या वाचकांनी वृत्तपत्र वाचण्याच्या वेळेत दररोज आणखी २२ मिनिटांची वाढ झाली आहे. वाचक आता तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र बारकाईने वाचतात. हा निष्कर्ष एका सर्वेक्षणाच्या आधारे काढण्यात आला आहे. अ‍ॅडव्हान्स फिल्ड अ‍ॅण्ड ब्रँड सोल्युशन्स या मार्केट रिसर्च कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. लॉकडाउन लागू होण्याच्या आधी वाचक वृत्तपत्राचे वाचन सरासरी ३८ मिनिटांपर्यंत करत असे. विश्वासार्ह बातम्या आणि माहितीसाठी विश्वास वृत्तपत्रांवरचवृत्तपत्रे ही विश्वासार्ह माहिती व बातम्या मिळविण्याचा स्रोत आहे. वृत्तपत्र ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे सध्याच्या आव्हानात्मक काळात पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्याचे हे महत्त्व पुढील काळातही अबाधित राहून आणखी वाढणार आहे, असेही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या वाचकांपैकी 40% लोकांनी सांगितले की, ते आता सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचतात. लॉकडाउनच्या आधी १६ टक्के लोकच एक तासापेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचत असत.जे लोक पूर्वी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचत असत त्यांची संख्या आता ४२ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. जे वाचक १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ वृत्तपत्र वाचत होते त्यांची संख्या १४ टक्के होती. आता त्यात घट होऊन ते प्रमाण ३ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच ते आता अधिक वेळ वृत्तपत्र वाचतात.या सर्वेक्षणात आढळून आले की, ४२ टक्के लोक रोजचे वृत्तपत्र एकदा नव्हे तर त्यापेक्षा जास्त वेळा हाती धरून त्यातील विविध प्रकारच्या बातम्या अधिक लक्षपूर्वक वाचतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या