शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकल, मॉलमधील लससक्ती मागे?; तत्कालीन निर्णयाबद्दल हायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 05:23 IST

केवळ लसवंतांनाच मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा आदेश मागे घेणार की नाही, याची माहिती मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मंगळवारपर्यंत देऊ द्या,’ असे न्यायालयाने सांगितले.

मुंबई : लोकल, मॉल, सरकारी कार्यालये, थिएटर आणि सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस सक्तीचा माजी मुख्य सचिवांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेनुसार नसल्याचे दिसते. त्यामुळे तो मागे घेणार की नाही, याबाबत विद्यमान मुख्य सचिवांशी सल्लामसलत करून मंगळवारी उत्तर द्या, असे तोंडी निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. ‘जे झाले ते झाले... आता नव्याने सुरुवात करूया,’ असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी म्हटले आणि ‘केवळ लसवंतांनाच मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा आदेश मागे घेणार की नाही, याची माहिती मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मंगळवारपर्यंत देऊ द्या,’ असे सांगितले.

‘कोरोना संकटाच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे आणि महाराष्ट्र सरकारने हे संकट उत्तमरीत्या हाताळले आहे. मग कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नसलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीचा आदेश कायम ठेवून राज्याच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी परिस्थिती का ओढवून घेता?’ असे मत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने मांडले. मुख्य सचिव म्हणजे सरकार नव्हे. ते प्रशासनाचे मुख्य आहेत. माजी मुख्य सचिवांनी लसवंतांनाच मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात दिलेला आदेश कायदेशीर प्रक्रियेनुसार नाही. टास्क फोर्सच्या शिफारशींचा आधार न घेता परस्पर निर्णय घेतला. त्यामुळे तो आदेश मागे घेणार की नाही, याबाबत विद्यमान मुख्य सचिवांशी सल्लामसलत करा आणि मंगळवारी माहिती द्या, असे तोंडी निर्देश त्यांनी सरकारला दिले.

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले आहे आव्हानकोरोना प्रतिबंध लस न घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास न करू देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अशा प्रकारची सक्ती करून राज्य सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.

काय परिणाम होऊ शकतो? केवळ लसवंतांनाच लोकल, मॉल, थिएटर, सरकारी कार्यालये, अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याची सध्याची याचिका मुंबईच्या संदर्भातील आहे. मात्र, राज्य सरकारने हे निर्बंध मागे घेतले तर राज्यातील मॉल, थिएटर, सरकारी कार्यालये, अन्य सार्वजनिक ठिकाणीही दोन लसी न घेतलेल्यांना त्याचा फायदा मिळेल. सर्वांना या ठिकाणी प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रHigh Courtउच्च न्यायालय