शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आता लक्ष्य शून्य मृत्यूदराचे, संसर्ग नियंत्रणात; टास्क फोर्ससमोर नवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 09:24 IST

Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आला आहे, शिवाय निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्या आटोक्यात असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आला आहे, शिवाय निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्या आटोक्यात असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, तरीही संसर्ग स्थितीवर तज्ज्ञांचे लक्ष असून, आता शून्य मृत्यूदराचे नवे उद्दिष्ट समोर बाळगले असल्याचे मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने मांडले आहे.कोरोना संसर्गाला वीस महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्ससमोर शून्य मृत्यूदराचे लक्ष्य आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरीही हा विषाणू अजून गेलेला नाही. त्यामुळे गतीने उपचार संशोधन सुरू आहे. या विषाणूचे नवे धोके, लसीकरण, प्रतिपिंडाची निर्मिती या वेगवेगळ्या विषयांवर सतत वैद्यकीय तज्ज्ञांनी चर्चा सुरू आहे.सध्या कोविड विषाणू संसर्गाचा काळ २ ते ३ आठवडे आहे. संसर्गाचा दुसरा आठवडा अतिशय कठीण असतो, कारण त्या काळात लक्षणे दिसून येतात, तीव्र होण्याचाही धोका असतो. याखेरीज, पोस्ट कोविड सिंड्रोमचा कालावधी १०० दिवसांवर येऊन ठेपला आहे. तिसऱ्या लाटेविषयी डॉ. जोशी यांनी सांगितले, तिसरी लाट ही सौम्य असेल, साधारण डिसेंबर – जानेवारीच्या कालावधीत हा संसर्ग येईल. यावेळेस विषाणूत जनुकीय बदल घडण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई