शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...म्हणून पुढील दोन महिने राज्यासाठी धोक्याचे; कोविड टास्क फोर्सकडून महत्त्वाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 07:28 IST

मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. बऱ्याच जिल्ह्यांत दैनंदिन रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी झाले, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले तरीही पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचे मत राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. कोरोनामुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले.याविषयी, कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, सध्या राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण जास्त असून निदानाचे प्रमाण कमी आहे. कोरोना संसर्ग कमी होतोय, हे खरे आहे. मात्र कोरोना गेलेला नाही हे सामान्यांनी लक्षात घ्यायला हवे. पुढील दोन महिन्यांचा काळ हा संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, महत्त्वाचे म्हणजे बरेच सण-उत्सव आहेत. राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांचे परिणाम पुढील दोन आठवड्यांत लक्षात येतील. यापूर्वीही, निर्बंध शिथिलतेनंतर नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे संसर्ग वाढल्याचे आपण पाहिलेले आहे, हा अनुभव लक्षात घेऊन येत्या काळात अधिक सतर्कपणे वागले पाहिजे.कोरोना नियमांचे पालन गरजेचेराज्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडत आहेत. पर्यटनाचे प्रमाणही मागील महिन्यांच्या तुलनेत वाढले आहे. परंतु, या सगळ्यात संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन केले पाहिजे. सध्या अनेक जण मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. हा प्रकार स्वत:च्या आरोग्यासह इतरांसाठीही तितकाच धोकादायक आहे, असे टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या