शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

CoronaVirus News: गेल्या वर्षी केंद्र सरकारने केलेल्या चुका राज्य शासनाने करू नयेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 02:25 IST

नागरिकांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याची काळजी, खबरदारी घेत निर्णय घ्यावेत, अशी विनंतीच तज्ज्ञांनी सरकारला केली आहे. 

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार गेला आहे. परिणामी आता कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्बंध लावा. असे निर्बंधच आपल्याला यातून बाहेर काढू शकतील. मात्र लॉकडाऊन लावू नका, असा सूर सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी लगावला आहे. शिक्षण, अर्थकारण, संस्कृती, कामगार, वाहतूक अशा प्रत्येक घटकाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आता हे असेच सुरू राहिले. लोकांनी नियम पाळले नाहीत तर मोठी किंमत मोजावी लागेल. गेल्या वर्षी कोरोनाचे समूळ उच्चाटन करताना केंद्राने ज्या चुका केल्या त्या चुका राज्याने करू नयेत. तज्ज्ञांशी बोलून निर्णय घ्यावेत. नागरिकांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याची काळजी, खबरदारी घेत निर्णय घ्यावेत, अशी विनंतीच तज्ज्ञांनी सरकारला केली आहे. हातावर पोट आहे त्यांचे काय होणार हा प्रश्नच आहे. मागच्या वेळी केंद्राने मदत केली म्हणून आपण काही तरलो. राज्य सरकारने त्यावेळी काहीच मदत केली नाही. वाऱ्यावर सोडले होते. आज पुन्हा परिस्थिती तशीच होते आहे. आता कुठे फेरीवाले किंवा हातावर पोट असणारे स्थिर होत होते; पण पुन्हा अडचण येत आहे. घरेलू कामगारांना आता अडचणी येतील. त्यांना सोसायट्या बंद होतील. त्यांची नोकरी जाईल. मात्र, अशा लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.- सुभाष मराठे निमगावकर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना  . गेल्या लॉकडाऊनच्या काळात बहुतांश कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’साठी आवश्यक सुविधा उभ्या केल्या होत्या. त्यांना ती व्यवस्था कायम सुरू ठेवण्याची सूचना करावी. कामाच्या वेळा बदलाव्यात, जेणेकरून लोकलमधील गर्दी कमी होईल. बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य घ्यावे. सद्य:स्थितीत ते पूर्ण सहकार्य करतील. भाजीविक्रेते फेरीवाल्यांना मोकळ्या मैदानात जाण्याची सक्ती करावी, ऐकत नसल्यास कठोर कारवाई करावी.- सुधाकर अपराज, विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्टनागरिकांच्या सहकार्याने कोरोना नियंत्रणात आणता येईल. नागरिकांनी  शिस्त पाळून मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हात सतत धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क घालत नसलेल्या नागरिकांकडून पाच हजार रुपये दंड वसूल करावा आणि हे काम पालिकेऐवजी पोलिसांकडे सोपवावे. आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेकारी वाढली आहे. संपूर्ण लॉकडाऊन हा परवडणारा नाही.  ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण जास्त आहेत तो भाग सील करावा.- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशनसध्या राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता कठोर निर्बंधांची गरज आहे. बाजारपेठा, लोकलच्या वेळा, मॉल, सिनेमागृह येथील प्रवेशावर बंधने घातली पाहिजेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यात तात्पुरत्या कोविड केंद्राची उभारणी, कंत्राट पद्धतीवर मनुष्यबळाची भरती, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी यंत्रणांनी घेतली पाहिजे.- डॉ पार्थिव संघवी, आयएमए सदस्य.राज्यासह शहरातील लसीकरण मोहीम व्यापक करण्याची अधिक गरज आहे, सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालणे अत्यवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आरोग्यसेवा क्षेत्रासाठी भरीव निधी, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ यांची तरतूद करणे आवश्यक आहे. मागील लॉकडाऊनच्या वेळीस मोठ्या प्रमाणात लोकांना मानसिक आरोग्याच्याही समस्या उद्‌भवल्या होत्या, त्यांच्या निराकरणासाठी हेल्पलाईन, समुपदेशन या पातळ्यांवरही प्रयत्न केले पाहिजेत. - डॉ अभिजित मोरे, जनआरोग्य चळवळ, सदस्य.‘कोरोना अहवालाबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम आहेत. एकाच व्यक्तीचे अहवाल दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह येतात. राज्य सरकारने ‘’टेस्टिंग लॅब’’ची विश्वासार्हता पडताळावी. तसेच खासगी लॅबमध्ये असलेली दोन-दोन दिवसांची वेटिंग टाळण्यासाठी सरकारी ‘’टेस्टिंग फॅसिलिटी’’ घरपोच मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व ऑफिससाठी कोरोना काळात ठोस नियमावली जाहीर करावी. जेणे करून त्या ठिकाणी होणारे गैरप्रकार टाळता येतील.- रमेश चव्हाण, व्यावसायिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करता कामा नयेत. कामगारांसाठी जी रुग्णालये आहेत ती सर्वसामान्यांसाठी खुली केली पाहिजेत. हे जनतेच्या उपयोगाला आले पाहिजेत. आवश्यकता असेल तर लॉकडाऊनचा विचार करावा. मुख्यमंंत्र्यांनी तज्ज्ञांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यावा.- मिलिंद रानडे, प्रवक्ता, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया‘केंद्र आणि राज्य सरकार त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळत आहेतच. मात्र, नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करीत योगा, व्यायाम यासारख्या गोष्टींवर भर देऊन स्वतःला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. कारण कोरोनाची घातकता ही प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे ती वाढविणे हे प्रत्येकाच्या हातात आहे त्यानुसार नागरिकांनी त्यावर भर देणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोनाच काय, तर आपल्याला कोणत्याही व्हायरसशी सहज दोन हात करता येतील.                       - संजय मोदी, प्लेटलेट्स डोनरबाजारपेठा, बसगाड्या, रेल्वेमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. शहरांच्या धर्तीवर ग्रामीण भागांतही आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रादुर्भाव अधिक असलेले प्रभाग शोधून अधिकाधिक चाचण्या कराव्यात. मास्कबाबत अजूनही काहीजणांना गांभीर्य नाही; त्यांच्यावर कडक कारवाई करावी. लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.- अर्चना सबनीस, मुंबई ग्राहक पंचायत 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या