शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मोलानुपिराविर कधी घ्यायची? आपत्कालीन वापरास राज्यात परवानगी; देशामध्ये मात्र बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 09:24 IST

केंद्र सरकारने उपचार पद्धतीमध्ये मोलानुपिराविर या अँटिकायरल औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे. 

मुंबई : कोरोनावर उपचार करणे आता सोपे होणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविडवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांना सशर्त मंजुरी दिली आहे. मोलानुपिराविर असे या गोळीचे नाव आहे. हे औषध मुळात जर्मन औषध निर्माता कंपनी मर्क फार्माचे आहे. कोरोनावरील एखाद्या औषधाला मंजुरी देणारा ब्रिटन जगातील पहिलाच देश ठरला आहे. केंद्र सरकारने उपचार पद्धतीमध्ये मोलानुपिराविर या अँटिकायरल औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आपत्कालीन रुग्णांमध्ये वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन मर्यादित वापरासाठी या औषधाला मान्यता दिली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. मोलानुपिराविर औषधाच्या कोरोना रुग्णांसाठी वापराला एफडीएची मान्यता नाही. मागील वर्षात २८ डिसेंबर रोजी केंद्रीय औषध नियामक मंडळाकडून गोळ्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. तरीही कोरोना उपचारामध्ये मोलानुपिराविरचा वापर करू नये, असेच आयसीएमआरने सांगितले होते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या औषधाचा वापर केल्यास त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ रुग्णावर येणार नसल्याचे क्लिनिकल ट्रायल्समध्ये दिसून आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे. काय म्हटले आहे निर्देशात ?सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोना लागण झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता अधिक असते. ही शक्यता या औषधामुळे टाळणे शक्य होते. आजाराच्या पहिल्या पाच दिवसांमध्येच त्याचा वापर उपयुक्त ठरू शकतो, असेही निर्देशात म्हटले आहे. अठरा वर्षांखालील तसेच गर्भवतींना हे औषध देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात - राजेश टोपेराज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून, कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला राज्यात कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, सध्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे आणि जास्तीत जास्त जणांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या