शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

CoronaVirus News: मृतदेह बघून स्मशानही गहिवरले; अंत्यविधीसाठीही वेटिंग लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:18 IST

नांदेड, अहमदनगरमध्ये एकाच दिवसात ६८ मृतांवर अंत्यसंस्कार

अहमदनगर/नांदेड : राज्यात कोरोनाचा कहर वाढला असून, मृत्यूचे तांडव सुरू आहे. स्मशानभूमीही कमी पडू लागल्या असून, सामूहिक अंत्यसंस्कार  किंवा प्रतीक्षा याशिवाय पर्याय नसल्याचे विदारक  चित्र अहमदनगर आणि नांदेड येथे पाहायला मिळाले. नगर येथील स्मशानभूमीत तब्बल ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेडमध्ये २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले, तर १३ मृतदेहांना अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याने स्मशानभूमीही गहिवरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अहमदनगरमध्ये गुरुवारी दिवसभरात ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्वजण कोरोनामुळेच दगावले. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. वर्षभरातील सर्वाधिक मृत्यू एका दिवसात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा गुरुवारी एकदम वाढला. दिवसभरात अमरधामध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ आशा ४५ जणांवर अंत्यविधी करण्यात आला. २२ मृतदेह ओट्यांवर ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार सहायक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूकजिल्हा शासकीय रुग्णालयातून मतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. मनपाने आणखी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन वर्ष उलटले, तरी अद्याप त्यास मुहूर्त मिळालेला नाही.स्मशानभूमीची दारे बंद  कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एकीकडे वाढत असताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मात्र स्मशानभूमींची दारे बंद झाली आहेत. शहरातील स्मशानभूमीच्या गेटला कुलूप ठोकण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतची परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फलक लावण्यात आला आहे.नांदेड : सहा तासांत २३ जणांवर अंत्यसंस्कार, १३ मृतदेह प्रतीक्षेतनांदेड महानगरपालिकेच्या वतीने गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी ८ ते २ या वेळेत तब्बल २३ मृतदेहांवर महापालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले, तर आणखी १३ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शांतीधाम परिसरात वेटिंगवर असल्याचे चित्र होते. शुक्रवारी शांतीधाम परिसरात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाच्या रांगा लागल्या होत्या. एकाच वेळी अनेक मृतदेहांना अग्नी दिल्याने या परिसरात धुराचा लोट उठला होता. त्यातच अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मोजक्या नातेवाइकांच्या आक्रोश आणि मृतदेह घेऊन येणाऱ्या सायरनच्या अस्वस्थ करणाऱ्या आवाजाने शांतीधाम परिसरातील वातावरण मन बधिर करून टाकणारे होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या