शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना मृतांच्या नातेवाईकांना अनुदानासाठी शंभर कोटी; खात्यात लवकरच जमा होणार रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 07:41 IST

लवकरच कोविड मृतांच्या पात्र नातेवाइकांना अनुदान वितरित करण्याचे काम सुरू होणार

मुंबई :  राज्यात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारस किंवा जवळच्या नातेवाइकांना ५० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानासाठी २० हजार जण पात्र ठरले असून, यांच्या अनुदानासाठी राज्य सरकारने १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यासाठी शासन स्तरावर संकेतस्थळ सुरू करणे, बँक खाते उघडण्यासह आवश्यक कार्यवाही संदर्भातील शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला आहे. त्यामुळे लवकरच कोविड मृतांच्या पात्र नातेवाइकांना अनुदान वितरित करण्याचे काम सुरू होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील कोरोना मृतांच्या नातेवाइकांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला. मात्र, कोविड मृतांची संख्या मोठी असल्याने पडणारा आर्थिक भार लक्षात घेत अनेक राज्यात हे काम संथगतीने सुरू होते. मात्र, न्यायालयाने कडक भूमिका घेत सर्व राज्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत केली जाणार आहे. यासाठी नवी वेबसाईट देखील विकसित करण्यात येणार असल्याची घोषणाही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. तसेच अनुदान वितरणाची पद्धतही ठरविण्यात आली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येणाऱ्या २० हजार पात्र अर्जदारांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. नवे वेब पोर्टल सुरूअनुदानासाठी मंजूर केलेली ही सर्व रक्कम आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांच्या नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित पात्र अर्जदारांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्याने वेब पोर्टलदेखील सुरू करण्यात आले असून त्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कसा करावा तसेच या योजनेची संपूर्ण तपशीलवार कार्यपद्धती याची माहिती देण्यात आली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या