शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना काळात फळे, भाजीपाल्याने दिला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 02:59 IST

पणन महासंघामार्फत २७ हजार टनांची झाली निर्यात

- विशाल शिर्केपिंपरी : कोरोना काळात राज्यातील शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रामार्फत तब्बल २७ हजार ६०६ टन फळे आणि भाजीपाल्याची निर्यात केली आहे. यातून सुमारे ३४५ कोटी ७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.कृषी मालाची निर्यात करण्यासाठी राज्यात ४४ निर्यात सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यात प्रीकुलिंग, शीतगृह, रायपनिंग चेंबर, पॅकहाऊस, विशेष प्रक्रिया सुविधा, विकिरण प्रक्रिया, व्हेपर हीट ट्रीटमेंट अशा सुविधांचा यात समावेश आहे. या सुविधांचा वापर करून आंबा, द्राक्ष, केळी, डाळिंब, कांदा, वांगी, भाजीपाला, हिरवी मिरची, तसेच मसाल्याचे पदार्थ, आटा असा कृषी प्रक्रिया केलेला मालही निर्यात करण्यात येत आहे. कोरोना काळात या सुविधेच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत २७ हजार ६०६ टन शेतमाल निर्यात करण्यात आला. त्या माध्यमातून ३४५ कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. आंतरराष्ट्रीय निकष पाळून भाजीपाला व फळे निर्यात केली जात आहेत. व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधेमुळे किडमुक्त आंबा निर्यात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे युरोपियन समुदाय, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाची बाजारपेठ आपल्यासाठी खुली झाली आहे. विकिरण सुविधेच्या वापरामुळे कृषी मालाची निर्यात वाढली. कांदा, मसाल्याचे पदार्थ, पशुखाद्य, सुकामेवा, आटा, मैदा असे कृषी प्रक्रिया केलेले पदार्थही पाठविणे शक्य झाल्याची माहिती पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.पॅकेजिंग, तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमावला विश्वासपणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रामार्फत निर्यात होणा-या मालाची गुणवत्ता टिकवून ठेवली जाते. उत्कृष्ट पॅकेजिंग, विकिरण, व्हेपर हीट ट्रीटमेंट, शेतमालाची वैज्ञानिकदृष्ट्या हाताळणी यामुळे मालाची गुणवत्ता टिकून राहते. ॲग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटीच्या (अपेडा) संगणक प्रणालीमध्ये नोंदणीकृत मालच प्रक्रिया करून निर्यात केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या