शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सेरो सर्वेक्षणातून आरोग्य विभाग करणार राज्यातील कोरोना संसर्गाचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 07:46 IST

राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यात लवकरच सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध शिथिल केल्यामुळे आता यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्ण व मृत्युसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यात लवकरच सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात घेण्यात येणाऱ्या सेरो सर्वेक्षणात ३६ जिल्ह्यांतील संसर्गाची स्थिती अभ्यासण्यात येईल, याविषयी वैद्यकीय तज्ज्ञांशीही चर्चा करण्यात येणार आहे. याखेरीज पालिका - जिल्हा पातळीवर स्थानिक प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत पुणे, मुंबई आणि नागपूर येथे सेरो सर्वेक्षण पार पडले आहे. केरळ राज्यात नुकतेच राज्यस्तरीय सेरो सर्वेक्षण पार पडले. त्या विविध वयोगटातील व्यक्तींमध्ये अधिक प्रतिपिंडाची क्षमता असल्याचे आढळून आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हे सर्वेक्षण घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.या सेरो सर्वेक्षणाकरिता जिल्हा पातळीवरून मोठ्या प्रमाणात नमुने घेण्यात येतील. या सर्वेक्षणातून डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रतिपिंडाची निर्मिती झाली का हेसुद्धा पडताळण्यास मदत होईल. याबाबत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, कोरोनाविषयक निर्बंध शिथिल करूनही अजूनही संसर्ग नियंत्रणात आहे. यामागील नेमके कारण अभ्यासण्याची गरज आहे. सेरो सर्वेक्षणाप्रमाणेच जिनोम सिक्वेन्सिंगही आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले....असे केले जाते सेरो सर्वेक्षणहे सर्वेक्षण १२ वयोगटावरील व्यक्तींमध्ये करण्यात येते.झोपडपट्टी, दाटीवाटीच्या वस्त्या आणि इतर विभागांमधून दहा हजार नमुने गोळा केले जात आहेत. या नमुन्यांमधून प्रतिपिंडाचे निदान केले जाईल.किती जणांच्या शरीरात कोरोना ॲन्टिबॉडीज तयार झाल्या आहेत हे तपासले जाईल.प्रतिपिंडाच्या निदानावरून कोविड संसर्ग संक्रमणाचा कल समजून घेता येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या