मुंबई : कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिलेजात आहे.मागेल त्याला काम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काळजी करू नका, मागेल त्याच्या हाताला काम नक्की मिळेल असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामे सुरु असून त्यावर ५ लाख ९२ हजार ५२५ मजूर उपस्थित आहेत. काम उपलब्धकरून देण्यामध्ये तीन विभाग आघाडीवर आहेत. यामध्ये सर्वाधिक कामे ग्रामपंचायत क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली असून ती३६ हजार ०४६ आहेत. कृषी विभागाने ५५२९ कामे तर रेशीम संचालनालयाने १३२९ कामे उपल्ध करून दिली आहेत.
CoronaVirus News : मागेल त्याला काम द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 05:32 IST